म्हाळगी प्रबोधिनीच्या सेवेत कुलगुरू मग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:15 AM2017-07-30T01:15:09+5:302017-07-30T01:15:09+5:30

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती करीत असताना, विद्यमान कुलगुरूंपेक्षा अधिक अनुभवी व कार्यक्षम उमेदवारांनी अर्ज केले असतानाही, रामभाऊ म्हाळगी

mahaalagai-parabaodhainaicayaa-saevaeta-kaulagaurauu-magana | म्हाळगी प्रबोधिनीच्या सेवेत कुलगुरू मग्न

म्हाळगी प्रबोधिनीच्या सेवेत कुलगुरू मग्न

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती करीत असताना, विद्यमान कुलगुरूंपेक्षा अधिक अनुभवी व कार्यक्षम उमेदवारांनी अर्ज केले असतानाही, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये तीन वर्षे काम केल्याचा अनुभव आणि संघाशी संबंध हीच गुणवत्ता लक्षात घेऊन, विद्यमान कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनीदेखील गुरुदक्षिणा म्हणून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला मुंबई विद्यापीठाशी संलग्न संशोधन संस्था म्हणून मान्यता दिली, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
आता भविष्यात पीएच.डी आणि एम. ए (राज्यशास्त्र) सारख्या पदव्यादेखील ही प्रबोधिनी देऊ शकणार आहे. शिक्षणाचे भगवेकरण करण्याचा हा डाव आता लाखो विद्यार्थ्यांच्या अंगाशी आला आहे. शिक्षण क्षेत्रातील नियुक्त्या करताना, कार्यक्षमता, अनुभव आणि पात्रता या गुणांऐवजी संघाशी संबंधित असणाºया, संघ विचारधारा मानणाºया लोकांना प्राधान्य दिल्यानेच मुंबई विद्यापीठाची ही अवस्था झाली आहे. सावंत म्हणाले, ‘अनेक कार्यक्षम आणि लायक लोकांना डावलून त्यांचा बळी दिला जात आहे. मुंबई विद्यापीठातील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही.’
राज्यपालांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची हकालपट्टी करून, सुयोग्य व्यक्तीची कुलगुरूपदी नियुक्त करावी, तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. शिक्षणमंत्री व उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री यांनीही जबाबदारी स्वीकारून पायउतार व्हावे, असे सावंत म्हणाले.

जाणीवपूर्वक दुर्लक्ष
कुलगुरूंच्या संघाशी असणाºया जवळिकीमुळेच, शासनाने मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणण्याचे काम कुलगुरूंनी केले. काँग्रेस या संपूर्ण प्रकाराचा निषेध करत असल्याचे सावंत म्हणाले.

Web Title: mahaalagai-parabaodhainaicayaa-saevaeta-kaulagaurauu-magana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.