Join us

दूषित पाण्यामुळे माहुलकर त्रस्त

By admin | Published: July 03, 2017 6:55 AM

मुंबईतील विविध विकास प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या नागरिकांना महानगरपालिकेने माहूल येथे पर्यायी घरे दिली असून, या प्रकल्पबाधितांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील विविध विकास प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या नागरिकांना महानगरपालिकेने माहूल येथे पर्यायी घरे दिली असून, या प्रकल्पबाधितांच्या घरांची मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पाहणी करत, घरांबाबत असलेल्या समस्या जाणून घेतल्या. प्रकल्पबाधितांनी आपल्या समस्या महापौरांना सांगितल्या. यामध्ये प्रदूषित परिसर, दूषित पाण्याचा पुरवठा, महापालिका रुग्णालय, शाळा, बेस्ट बस या सुविधांची कमतरता, घरांना लागलेली वाळवी, कचरा व घाणीचे साम्राज्य या सर्व समस्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. येथील रहिवाश्यांच्या जीविताला धोका निर्माण आहे, असेही त्यांनी नमूद केले. यावर सभागृहात सर्वपक्षीय चर्चा केली जाईल, असे आश्वासन महापौरांनी रहिवाशांना दिले. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार, प्रकल्पबाधितांना तीन किलोमीटरच्या परिसरात घरे देणे बंधनकारक आहे. माहूलशिवाय मुंबईत कोणत्याही ठिकाणी राहण्याची तयारी आहे, अशी मागणी नागरिकांनी केली.