Mahad Building Collapse: महाड दुर्घटनेत वाचलेल्या दोन चार वर्षीय मुलांचे स्वीकारणार पालकत्व; एकनाथ शिंदेंचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 07:09 PM2020-08-26T19:09:47+5:302020-08-26T19:10:55+5:30

मोहम्मद बांगी आणि अहमद शेखनाग अशी या दोन लहानग्यांची नावे आहेत.

Mahad Building Collapse: Minister Eknath Shinde will take care of four year old children who survived the Mahad accident | Mahad Building Collapse: महाड दुर्घटनेत वाचलेल्या दोन चार वर्षीय मुलांचे स्वीकारणार पालकत्व; एकनाथ शिंदेंचा निर्णय

Mahad Building Collapse: महाड दुर्घटनेत वाचलेल्या दोन चार वर्षीय मुलांचे स्वीकारणार पालकत्व; एकनाथ शिंदेंचा निर्णय

googlenewsNext

मुंबई - महाड येथील पाच मजली इमारत कोसळल्यामुळे आपले संपूर्ण कुटुंब गमावलेल्या चार वर्षांच्या दोन लहानग्यांचे पालकत्व नगरविकासमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले आहे.

मोहम्मद बांगी आणि अहमद शेखनाग अशी या दोन लहानग्यांची नावे आहेत. तब्बल १८ तासांच्या प्रयत्नानंतर मोहम्मद बांगी याला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात मदत पथकाला यश आले होते. परंतु, त्याची आई आणि भावंडांचा मात्र दुर्दैवी अंत झाला. तर, इमारत कोसळत असताना अहमद शेखनाग वेळीच बाहेर पडल्यामुळे बचावला असून त्याचे कुटुंबीय मात्र सुदैवी ठरले नाहीत.

या दोन्ही लहानग्यांचे पालकत्व स्वीकारत असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले आहे. दोन्ही मुलांच्या नावे बँक खात्यात प्रत्येकी १० लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील, तसेच त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने उचलण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.  या दुर्घटनेचे वृत्त समजताच  शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला वेग दिला होता. ठाणे महापालिकेची २ आपत्कालीन पथके आणि अग्निशमन दलाची तुकडीही  शिंदे यांच्या आदेशानुसार मदतकार्यात व्यग्र आहे.

"८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आजही याच तत्वानुसार वाटचाल करत आहे. त्यामुळे सामाजिक जाणिवेच्या भावनेतून या मुलांचे पालकत्व स्वीकारत आहे," असे शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Mahad Building Collapse: Minister Eknath Shinde will take care of four year old children who survived the Mahad accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.