Join us

...म्हणून पक्षांतरबंदीला जानकर घाबरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 2:33 AM

केंद्रीय आणि राज्य निवडणूक निर्णय आयोगाकडे दोन महिन्यांपूर्वी केलेल्या तक्रारीमुळेच दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी भाजपातर्फे विधान परिषद सदस्यासाठी अर्ज दाखल केला नसल्याचा दावा तक्रारदार हेमंत पाटील यांनी केला.

मुंबई : केंद्रीय आणि राज्य निवडणूक निर्णय आयोगाकडे दोन महिन्यांपूर्वी केलेल्या तक्रारीमुळेच दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी भाजपातर्फे विधान परिषद सदस्यासाठी अर्ज दाखल केला नसल्याचा दावा तक्रारदार हेमंत पाटील यांनी केला. त्यांनी जानकर यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी केली होती. भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेने ही तक्रार करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतानाही जानकर भाजपाच्या तिकीटावर मंत्री झालेच कसे? असा सवाल उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले. त्या आधारे जानकर यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती.

टॅग्स :महादेव जानकरराजकारण