हजारो कोटींचे महादेव ॲप घोटाळा प्रकरण: कपिल शर्माचा जबाब ईडीच्या आरोपपत्रात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 10:06 AM2023-10-28T10:06:48+5:302023-10-28T10:07:50+5:30
महादेव ॲप कंपनीने दुबईत एक कार्यक्रम आयोजित केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महादेव ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याने दुबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात कला सादरीकरण केल्याप्रकरणी ईडीने कॉमेडी किंग कपिल शर्मा याने ईडीला दिलेला जबाब ईडीने आपल्या आरोपपत्रात नमूद केला असून, मुस्कान इव्हेंट नावाच्या कंपनीने त्याला पैसे दिल्याची माहिती पुढे आली आहे. तब्बल सहा हजार कोटी रुपयांच्या महादेव ॲपप्रकरणी ईडीने अलीकडे रायपूर येथील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, महादेव ॲप कंपनीने दुबईत एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सादरीकरण करण्यासाठी कपिल शर्माच्या मॅनेजरला अभिजित चौधरी नावाच्या एका व्यक्तीने सौरभ चंद्राकर याच्या वतीने फोन केला होता. या सादरणीकरणाचे पैसे कपिल याला मुस्कान इव्हेंट नावाच्या कंपनीकडून मिळाले होते.