मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लसीकरण व्हावे तसेच त्यांना घराजवळ लस मिळावी, या सामाजिक जाणिवेतून मनसेच्या वतीने माहीम, दादर आणि प्रभादेवीतील नागरिकांसाठी विनामूल्य लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ गुरुवारी माहीम येथील तेंडुलकर सभागृहात शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पार्थ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या पुढाकारातून महालसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मनसेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेत २,१०० लस देण्यात आहे. हे लसीकरण शुक्रवार दि, ३ रोजी दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर व शनिवार दि, ४ रोजी प्रभादेवी येथील मनपा शाळेत पार पडणार असल्याचे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. अजूनही ज्यांनी पहिला व दुसरा डोस घेतलेला नाही तसेच नागरिकांना सुलभतेने लस मिळावी यासाठी मोहिमेचे आयोजन केले असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.