मुंबईत महामुक्काम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:08 AM2021-01-16T04:08:39+5:302021-01-16T04:08:39+5:30

मुंबई : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला निर्णायक टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने २३ ते २६ जानेवारी या काळात ...

Mahamukkam Andolan in Mumbai | मुंबईत महामुक्काम आंदोलन

मुंबईत महामुक्काम आंदोलन

Next

मुंबई : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला निर्णायक टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने २३ ते २६ जानेवारी या काळात राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. १८ जानेवारीला ‘किसान महिला दिवस’ साजरा करण्याची हाक दिली आहे. १३ ते १५ जानेवारी या काळात देशभर श्रमिकांनी शेतकरी-कामगारविरोधी काळ्या कायद्यांची होळी केली असून, आता महाराष्ट्रात या हाकेला प्रतिसाद देत समविचारी किसान, कामगार संघटना, सामाजिक व राजकीय संघटना एकत्र येऊन आंदोलनात उतरत आहेत. त्यानुसार, संघटना २३ जानेवारीला विविध भागांमधून ट्रॅक्टर्स व इतर वाहनांमधून हजारो श्रमिकांसह मुंबईच्या दिशेने निघतील. २४ जानेवारीला आझाद मैदान येथे एकत्र येतील. २५ जानेवारीला दुपारी दोन वाजता राजभवनाच्या दिशेने कूच करतील. २६ जानेवारी रोजी शेतकरी कामगारांतर्फे आझाद मैदान येथे राष्ट्रीय ध्वजवंदन केले जाईल, असे मोर्चाचे प्रभाकर नारकर यांनी सांगितले.

Web Title: Mahamukkam Andolan in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.