महापरिनिर्वाण दिनः शिवाजी पार्क, दादरकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 09:50 AM2023-12-06T09:50:49+5:302023-12-06T09:51:06+5:30
चैत्यभूमी, शिवाजीपार्क दादर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीत विविध बदल केले आहेत.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६७ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर परिसरात येणार असून मोठया प्रमाणात अनुयायांची गर्दी होणार आहे. त्यामुळे चैत्यभूमी, शिवाजीपार्क दादर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीत विविध बदल केले आहेत. हे बदल ७ डिसेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यत लागू असणार आहेत.
तीन दिवस या भागात ‘नो पार्किंग’ झोन :
स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज रोड, रानडे रोड, केळूस्कर रोड दक्षिण आणि उत्तर,एम. बी. राऊत रोड, पांडुरंग नाईक मार्ग, एन. सी. केळकर रोड, डॉ. वसंतराव जे. राथ मार्ग हा स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग ते अमेगो हॉटेलपर्यंत, किर्ती कॉलेज लेन मार्ग हा किर्ती कॉलेज सिग्नल ते मीरामार सोसायटीपर्यंत.
तसेच राजगृह परिसराच्या बाजूचा हिंदू कॉलनी रोड नं. ०१ ते रोड नं. ०५ पर्यंत, लखमशी नप्पू रोड हा शुभम हॉटेल ते रुईया कॉलेज, दडकर मैदानपर्यंत खारेघाट रोड नं. ०५ ते पाटकर गुरुजी चौक, लेडी जहांगीर रोड हा रुईया जंक्शन ते पाच गार्डन ते रॉन्ट जोसेफ स्कूलपर्यंत, तसेच दादर पूर्व परिसरातील टॅक्सी स्टँड मंगळवार सकाळी ६ ते गुरुवार रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
एक दिशा मार्ग व वाहतुकीसाठी बंद रस्ते :
स्वातंत्रवीर सावरकर मार्ग,रानडे रोड -ज्ञानेश्वर मंदिर रोड,टी. एच. कटारिया मार्ग
अवजड वाहनांना खालील मार्गावर प्रतिबंध
स्वातंत्रवीर सावरकर मार्गाच्या माहिम जंक्शन ते हर्डीकर जंक्शन
एल. जे. रोडच्या माहिम जंक्शन ते गडकरी जंक्शन
गोखले रोडच्या गडकरी जंक्शन ते धनमिल नाका
सेनापती बापट मार्गाच्या माहिम रेल्वे स्थानक ते वडाचा नाका
दादर टी. टी. सर्कल ते टिळक ब्रिजवर, वीर कोतवाल गार्डन ते संपूर्ण एन. सी. केळकर रोड,वाहतुकीची कोंडी झाल्यास पर्यायी मार्ग,दक्षिण वाहिनी पश्चिम द्रुतगती मार्ग,उत्तर वाहिनी कुलाबाकडून बी. ए. रोडने अथवा हाजी अली मार्ग,पुर्व द्रुतगती मार्ग
भोजन वाहन व्यवस्था :
भोजन व्यवस्था ही ट्राफिमा हॉटेल समोर, एम. बी. राऊत गार्ग पांडूरंग नाईक मार्ग, पिंगे चौक, सारस्वत बँक समोर, एस. एच. परळकर मार्ग, सीता निवास, विष्णू निवारा, लक्ष्मी निवास समोर, एल. जे. रोड आणि पद्माबाई ठक्कर मार्गाच्या पदपथावर करण्यात आलेली आहे.
वाहने पार्क करण्यास उपलब्ध रस्ते :
सेनापती बापट मार्ग, कामगार मैदान, इंडिया बुल इंटरनॅशनल सेंटर, इंडिया बुल्स ०१ सेंटर, कोहिनुर स्केअर, कोहिनुर मिल कंपाैंड, लोढा- कमला मिल कंपाैंड, पाच गार्डन, एडनवाला रोड, नाथालाल पारिख मार्ग,आर. ए. के. ४ रोड, वडाळा