Join us

बेस्टकडून महापरिनिर्वाण दिनानिमित विशेष सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 9:56 AM

परिवहन, विद्युत आणि सुविधाही पुरविणार बेस्ट.

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित दादर येथील चैत्यभूमीकडे येणाऱ्या अनुयायांसाठी बेस्टतर्फे सुविध पुरविण्यात येत आहेत.

बेस्ट उपक्रमाकडून विद्युत पुरवठ्यासोबत, वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुर्धर रोगांबद्दल जनजागृती तसेच तंबाखू व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन व मॅजिक मिक्सबद्दल माहिती देण्यात येणार आहे. तसेच, परिसरात पालिकेने परवानगी दिलेल्या विविध संस्थांच्या मंडपांना तात्पुरत्या मीटर जोडणीसाठी शिवाजी पार्क येथे एक खिडकी योजना उपलब्ध केली आहे.

बेस्ट उपक्रमाकडून शिवाजी पार्क, चैत्यभूमी दादर चौपाटी, राजगृह, दादासाहेब फाळके मार्ग, आंबेडकर महाविद्यालय, बडाळा आणि मादाम कामा मार्ग  अशा ठिकाणी अतिरिक्त १५० वॅटचे ४२७ एलईडी मार्गप्रकाश दिवे व २००० वॅटचे चार मेटल एलईडी अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे बसविण्यात येणार आहेत. विशेष बसचे आयोजन ६ डिसेंबर रोजी मुंबईतील विविध ठिकाणी असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या स्मृतिस्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या अनुयायांकरिता विनाशुल्क प्रवास असणाऱ्या विशेष बसचे आयोजन केले आहे. प्रवाशांच्या सोयीकरिता तात्पुरत्या दैनंदिन बसच्या पास ५० रुपयांत उपलब्ध करण्यात येणार आहेत.

मोफत वैद्यकीय तपासणी :

 बाबासाहेबांच्या अनुयायांकरिता बेस्ट उपक्रमाकडून मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार आणि प्रथमोपचार यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी मोफत चष्मे वाटप केले जाणार आहे. तसेच मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया रोगांबद्दलही माहिती दिली जाणार आहे.

टॅग्स :मुंबई