शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणारा वरळीचा महाराजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:06 AM2021-09-18T04:06:57+5:302021-09-18T04:06:57+5:30

मुंबई-महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि शतक महोत्सवाकडे वाटचाल करणारे आठव्या क्रमांकाचे गिरणगावातील गणेशोत्सव मंडळ म्हणजेच श्री गणेश सेवा मंडळ ...

Maharaja of Worli marching towards the centenary | शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणारा वरळीचा महाराजा

शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणारा वरळीचा महाराजा

googlenewsNext

मुंबई-महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि शतक महोत्सवाकडे वाटचाल करणारे आठव्या क्रमांकाचे गिरणगावातील गणेशोत्सव मंडळ म्हणजेच श्री गणेश सेवा मंडळ वरळी, ‘वरळीचा महाराजा’ मंडळाची सन १९२३ साली गुढीपाडव्याच्या शुभदिनी देश पारतंत्र्यात असताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी दिलेल्या हाकेला हाक देऊन केली.

वरळीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि जनतेने सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून या मंडळाची स्थापना करून एक छोटंसं समाजकार्याचे आणि भक्तीभावाच रोपट लावल आणि आज याच रोपट्याच एका विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे, श्री गणेश सेवा मंडळ शतकमहोत्सवाकडे वाटचाल करत ९९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

यंदा या मंडळाने फुलांच्या सजावटीचा देखावा साकार केला आहे. ४ फूट उंच गणेश मूर्ती मूर्तिकार सुशांत पोहेकर साकार केली आहे.

गेली अनेक दशके मंडळामार्फत रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, युवा मार्गदर्शन शिबिर तसेच विभागातील लोकांकरिता आरोग्यविषयक डॉक्टरांचे विनामूल्य मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जाते.

देशावर किंवा महाराष्ट्र राज्यावर ज्या ज्या वेळेस नैसर्गिक आपत्ती मग तो भूकंप असो वा महापूर असो वा कोरोनासारखी महामारी असो किंवा इतर कोणतीही संकट ओढावली त्या त्या वेळेस मंडळातर्फे प्रत्येक वेळेस मदतीचा हात पुढे करून आपला खारीचा वाटा पुढे केला आहे.

कोविड नियमांचे पालन करत मंडळाचे अध्यक्ष

सागर म्हात्रे, सरचिटणीस हेमंत नाईक, चिटणीस प्रफुल्ल सावंत, कार्याध्यक्ष दीपक बागवे व खजिनदार अनंत कदम आदी पदाधिकारी येथील सार्वजनिक उत्सव साजरे करत जनतेचे सर्वांमधील आपुलकीचे प्रेमाचे जिव्हाळ्याचे व बंधुत्वाचे नाते निर्माण व्हावे आणि एकत्रितपणे सामाजिक कार्य करत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक बांधिलकी जपणारे मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे.

Web Title: Maharaja of Worli marching towards the centenary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.