Join us

‘नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं’ ‘लोकमत’तर्फे महारक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:05 AM

मुंबई : ‘लोकमत’तर्फे १ जुलै ते १६ जुलै या कालावधीत राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नातं रक्ताचं, ...

मुंबई : ‘लोकमत’तर्फे १ जुलै ते १६ जुलै या कालावधीत राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं’ या मोहिमेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या दोन दिवसांत या रक्तदान शिबिरात राज्यभरातून १० हजारांहून अधिक दात्यांनी रक्तदान केले आहे.

स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरात महामुंबई परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

रक्तदान शिबिराची ठिकाणे

तारीख /उपनगर/ सहयोगी संस्था / पत्ता / वेळ

५ जुलै - पालघर : प्रेरणा राठोड - सरपंच, दिनेश ठाकूर - उपसरपंच, हितेंद्र विंदे - ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत बोराडी / जैन छात्रालय, डहाणू, पालघर / ९.३० ते ५.

५ जुलै - सानपाडा : सिक्युरिटी गार्डस्‌ बोर्ड फॉर मुंबई अँड ठाणे डिस्ट्रिक्ट / डी - ३०१/ई -३०१, सानपाडा रेल्वेस्थानक कॉम्प्लेक्स नवी मुंबई / १० ते ५

येथे संपर्क साधा

‘लोकमत’च्या रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होणाऱ्या संस्था किंवा संघटनांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी मुंबई महानगर प्रदेशात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी रोनाल्ड डिसोझा यांना ९०८२९९६५८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

या संकेतस्थळावर नोंदणी करा

http://bit.ly/lokmatblooddonation