महाराष्ट्रात पुरांमुळे ५० तर वीज, वादळांमुळे २३ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:05 AM2021-01-10T04:05:07+5:302021-01-10T04:05:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मान्सूनपूर्व, मान्सून आणि मान्सूननंतर देश, राज्य आणि शहरांत मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळला. परिणामी पुराच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मान्सूनपूर्व, मान्सून आणि मान्सूननंतर देश, राज्य आणि शहरांत मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळला. परिणामी पुराच्या घटना घडल्या असून, देशभरात अशा घटनांत तब्बल ६०० नागरिकांचे जीव गेले आहेत. तर महाराष्ट्रात ५० नागरिकांचे जीव गेले आहेत. देशभरात वीज पडून ८१५ नागरिकांचे जीव गेले असून, महाराष्ट्रात २३ नागरिकांचे जीव गेले आहेत. शिवाय थंडीच्या लाटेमुळे देशभरात १५० नागरिकांचे जीव गेले.
देशभरात २०२० साली मान्सून पुरेपूर बरसला आहे. मात्र अतिवृष्टी, पूर, जमीन खचणे, वादळ, वीज चमकणे आणि पडणे, थंडीच्या लाटा अशा घटना प्रामुख्याने घडल्या आहेत. अशा घटनांत मोठी मनुष्यहानी झाली आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात मोठी हानी झाली असून, येथे ३५० हून अधिक नागरिकांचे जीव गेले आहेत. २०२० साली चक्रीवादळेदेखील मोठी उठली. उत्तर हिंद महासागरात ५ चक्रीवादळे उठली. यामध्ये अम्फान, निवार, गती, निसर्ग आणि बुरेवी अशी त्यांची नावे आहेत. अरबी समुद्रात गती आणि निसर्ग तर बंगालच्या उपसागरात अम्फान, निवार, बुरेवी ही चक्रीवादळे उठली होती.
----------------
हवामान घडामोडी आणि मनुष्यहानी
आसाम १२९
केरळ ७२
तेलंगणा ६१
बिहार ५४
महाराष्ट्र ५०
उत्तर प्रदेश ४८
हिमाचल प्रदेश ३८
----------------
वादळ, वीज आणि मनुष्यहानी
बिहार २८०
उत्तर प्रदेश २२०
झारखंड १२२
मध्य प्रदेश ७२
महाराष्ट्र २३
आंध्र प्रदेश २०
----------------
थंडीच्या लाटा आणि मनुष्यहानी
उत्तर प्रदेश ८८
बिहार ४५
झारखंड १६
----------------
चक्रीवादळे आणि मनुष्यहानी
अम्फानमुळे ९० नागरिकांचे जीव गेले
निसर्गमुळे ४ नागरिकांचे जीव गेले
निवारमुळे १२ नागरिकांचे जीव गेले
बुरेवीमुळे ९ नागरिकांचे जीव गेले
(स्रोत : भारतीय हवामान शास्त्र विभाग)