Mumbai Fire, BREAKING: मुंबईत इमारतीच्या ११ व्या मजल्यावर भीषण आग, अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 03:24 PM2022-02-28T15:24:39+5:302022-02-28T15:27:51+5:30

मुंबईतील कांजुरमार्ग येथील रहिवासी इमारतीला आग लागली असून अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

Maharashtra A level 2 fire breaks out in NG Royal Park area in Kanjurmarg of Mumbai | Mumbai Fire, BREAKING: मुंबईत इमारतीच्या ११ व्या मजल्यावर भीषण आग, अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल

Mumbai Fire, BREAKING: मुंबईत इमारतीच्या ११ व्या मजल्यावर भीषण आग, अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल

googlenewsNext

मुंबई-

मुंबईतील कांजुरमार्ग येथील रहिवासी इमारतीला आग लागली असून अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.  विक्रोळी कांजूरमार्ग पूर्व येथील एनजी रॉयल पार्कमधील एका इमारतीच्या ११ व्या मजल्यावर आग लागली आहे. आगीनं रौद्र रुप धारण केलं असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

प्राथमिक माहितीनुसार, कांजूरमार्ग पूर्वेकडील एनजी रॉयल पार्कमधील २ बी पार्कमधील इमारतीत ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे पाच बंब पोहोचले. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: Maharashtra A level 2 fire breaks out in NG Royal Park area in Kanjurmarg of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.