Join us

१० मतदारसंघांवर ८ निरीक्षकांची नजर; आचारसंहिता, कायदा-सुव्यवस्था आणि खर्चावर ठेवणार लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2024 10:00 AM

Maharashtra Assembly Election 2024 : खर्चाविषयीचे निरीक्षक उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या तपासणीची जबाबदारी सांभाळणार आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : शहरातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी पाच सर्वसाधारण, निवडणूक खर्चविषयक दोन निरीक्षक आणि एक पोलिस निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून, हे सर्व जण नामनिर्देशनापासून मतमोजणीपर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेवर केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून लक्ष ठेवणार आहेत. शिवाय समाजातील विविध घटकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग आणि कायदा सुव्यवस्था याबाबत आयोगाला अहवालही सादर करतील. खर्चाविषयीचे निरीक्षक उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या तपासणीची जबाबदारी सांभाळणार आहेत.

यामध्ये धारावी व सायन कोळीवाड्यासाठी सत्यप्रकाश टी. एल., वडाळा व  माहिमसाठी हिमांशू गुप्ता, वरळी व शिवडीसाठी समीर वर्मा, भायखळा व मलबार हिलसाठी अंजना एम, मुंबादेवी व कुलाब्यासाठी शिल्पा शिंदे यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत या अधिकाऱ्यांची नागरिकांना भेट घेता येईल.

भेटीची वेळ दुपारी १२ ते १    केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळीसाठी विजय बाबू वसंता, तर शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाब्यासाठी अमन प्रित हे काम पाहणार आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूक