मुंबईत मनसेचे २५ उमेदवार, शिवडीत उद्धवसेनेविरोधात थेट लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 11:41 AM2024-10-31T11:41:07+5:302024-10-31T11:42:20+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. पण, मनसे मेळाव्यात त्यांनी विधानसभेसाठी राज्यात २२५ जागा लढविण्याची घोषणा केली होती.

Maharashtra Assembly Election 2024 : 25 candidates of MNS in Mumbai, Sewri fighting directly against Uddhav Sena | मुंबईत मनसेचे २५ उमेदवार, शिवडीत उद्धवसेनेविरोधात थेट लढत

मुंबईत मनसेचे २५ उमेदवार, शिवडीत उद्धवसेनेविरोधात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण राज्यभरात १३५ उमेदवार उभे केले आहेत. त्यात मुंबईतील २५ उमेदवारांचा समावेश आहे. शिवडीमध्ये महायुतीने उमेदवार दिला नाही. त्यामुळे येथे उद्धवसेनेचे अजय चौधरी आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यात थेट लढत होणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. पण, मनसे मेळाव्यात त्यांनी विधानसभेसाठी राज्यात २२५ जागा लढविण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्राचा दौरा करून त्यांनी इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या. त्यामुळे मनसे जास्त उमेदवारांसह निवडणुकीत उतरेल, अशी शक्यता होती. पण, मनसेने १३५ उमेदवार दिले आहेत. असे असले तरी भाजपनंतर जास्त उमेदवार देणारा मनसे हाच मोठा पक्ष ठरला आहे. 

महत्त्वाची नावे
 राज यांनी सर्वांत आधी मनसेनेते बाळा नांदगावकर यांची शिवडीतून उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर अमित ठाकरे (माहीम), संदीप देशपांडे (वरळी), स्नेहल जाधव (वडाळा), माजी आ. तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व), जुईली शेंडे (विलेपार्ले), शिरीष सावंत (भांडुप) आदी नेत्यांना निवडणुकीत उतरवले आहे.
 गेल्या निवडणुकीत पक्षाने १०१ जागा लढविल्या होत्या. मात्र, केवळ कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील आमदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे यावेळी मनसेचे किती आमदार निवडून येतील, हा प्रश्न चर्चेत आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : 25 candidates of MNS in Mumbai, Sewri fighting directly against Uddhav Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.