प्रचारासाठी उमेदवारांची ‘फराळ’ डिप्लोमसी; दिवाळीत मतदारांऐवजी कार्यकर्त्यांच्या घरी जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 01:51 PM2024-10-30T13:51:10+5:302024-10-30T13:55:57+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : प्रचाराची ही रणनीती सर्वच राजकीय पक्षांनी आखली असली याबाबत कुणीही उघडपणे बोलत नसल्याचे चित्र आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : Candidates' 'Faral' diplomacy for campaigning; Instead of voters, they will go to the houses of workers on Diwali | प्रचारासाठी उमेदवारांची ‘फराळ’ डिप्लोमसी; दिवाळीत मतदारांऐवजी कार्यकर्त्यांच्या घरी जाणार

प्रचारासाठी उमेदवारांची ‘फराळ’ डिप्लोमसी; दिवाळीत मतदारांऐवजी कार्यकर्त्यांच्या घरी जाणार

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : दिवाळीचा वापर करण्याचे तंत्र अंगिकारले आहे. थेट सणाच्या दिवशी कार्यकर्त्याच्या मतदारांच्या दारात जाऊन रोष ओढवून घेण्याऐवजी दिवाळी सणाच्या नावाखाली चाळी, सोसायटींमधील कार्यक्रमाला हजेरी लावण्याकडे उमेदवारांचा कल असल्याचे मलबार हिलमधील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने सांगितले. त्यातच निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी दिवाळी सणाच्या दिवशी कशा पद्धतीने प्रचार कारवायचा यासाठी क्रिएटिव्ह टीमच्या खास बैठकाही आयोजित केल्या आहेत.

त्या काळात थेट मते मागण्याऐवजी नागरिकांवर विविध माध्यमांतून दिवाळीच्या शुभेच्छांचा ‘वर्षाव’ करण्यात येणार असल्याचे समजते. सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या प्रचाराने हैदोस घातला आहे. मोबाइलवर सर्वच उमेदवारांच्या नावे शुभेच्छा मिळत असल्याने नागरिक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. सोशल मीडियावरील अतिरेकी प्रचार होणार नाही, यासाठी काही उमेदवार ‘ आस्ते कदम’ टाकताना सुद्धा पाहायला मिळत आहे.

प्रत्यक्ष भेटीचे नियोजन ४ नोव्हेंबरला
घरोघरी जाऊन प्रचार करणे हे सर्वच उमेदवाराचे लक्ष्य असून, ते नियोजन ४ नोव्हेंबरला करणार असल्याचे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. 
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार असल्याचे स्पष्ट होईल. अनेक अपक्ष, बंडखोर उमेदवार या शेवटच्या दिवशी उमेदवारी मागे घेत असल्याचे चित्र यापूर्वीच्या निवडणुकीत दिसले आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : Candidates' 'Faral' diplomacy for campaigning; Instead of voters, they will go to the houses of workers on Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.