एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार; गृहऐवजी नगरविकास अन् आणखी एक महत्त्वाचे खाते मिळणार?

By यदू जोशी | Published: December 4, 2024 05:24 AM2024-12-04T05:24:45+5:302024-12-04T05:25:29+5:30

शिंदेसेनेच्या एका नेत्याने 'लोकमत'ला सांगितले की याबाबत पक्षाच्या आमदारांनी केलेला आग्रह त्यांनी मान्य केला आहे. 

maharashtra assembly election 2024 Eknath Shinde will take the post of Deputy Chief Minister; Urban development and another important account instead of housing? | एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार; गृहऐवजी नगरविकास अन् आणखी एक महत्त्वाचे खाते मिळणार?

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार; गृहऐवजी नगरविकास अन् आणखी एक महत्त्वाचे खाते मिळणार?

यदु जोशी 

मुंबई : एकनाथ शिंदे हे महायुतीच्या नवीन मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याची माहिती अत्यंत खात्रीलायक सूत्रांनी दिली. शिंदेसेनेच्या एका नेत्याने 'लोकमत'ला सांगितले की याबाबत पक्षाच्या आमदारांनी केलेला आग्रह त्यांनी मान्य केला आहे. 

भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा शपथविधी दि. ५ डिसेंबरला होत असताना शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? याविषयी पाच दिवसांपासून उलटसुलट चर्चा होती.

शिंदे उपमुख्यमंत्री होतील पण त्यांना गृहमंत्रिपद द्यायला हवा अशी मागणी शिंदेसेनेकडून करण्यात आली होती. माजी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय शिरसाट यांनी जाहीरपणे तशी मागणी केली होती. मात्र, विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की गृहमंत्रिपद हे मुख्यमंत्र्यांकडेच राहावे, असा भाजपचा आग्रह आहे. तो मान्य करत शिंदे यांना नगरविकास आणि आणखी एक महत्त्वाचे (जसे एमएसआरडीसी) द्यावे, असा नवीन पर्याय समोर आला. त्यावर दोन्ही पक्ष राजी होतील असे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असतील असे अजित पवार यांनी चार दिवसांपूर्वीच म्हटले होते. त्यानुसार आता ते आणि शिंदे उपमुख्यमंत्री असणार आहेत.

तुम्ही मंत्रिमंडळात हवेच नेत्यांनी घातली गळ

शिंदे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे किंवा शिंदेंचे विश्वासू दादा भुसे उपमु- ख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. शिंदेसेनेच्या ज्येष्ठ आमदाराने 'लोकमत'ला सांगितले की, स्वतः एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात असलेच पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. 

मी सरकारमध्ये न राहता पक्षाचे काम पाहतो, असे शिंदे आम्हाला सांगत होते; पण आम्ही स्पष्टपणे सांगितले की तुम्ही असाल तरच आपले आमदार मंत्रिमंडळात असतील. शिंदे हेच आमचे नेते आहेत आणि ते मंत्रिमंडळात नसतील याची आम्ही कल्पनादेखील करू शकत नाही.

Web Title: maharashtra assembly election 2024 Eknath Shinde will take the post of Deputy Chief Minister; Urban development and another important account instead of housing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.