ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 06:17 PM2024-11-13T18:17:31+5:302024-11-13T18:19:13+5:30

अनंत नर यांचा कार्यकर्ता अमित पेडणेकर याने वायकर जर उबाठा बोललात तर त्यांची जीभ छाटली जाईल अशी खुलेआम धमकी दिली असाही आरोप वायकरांनी केला.

Maharashtra Assembly Election 2024 - In Jogeshwari Constituency Shiv Sena MP Ravindra Waikar made serious allegations against Uddhav Thackeray candidate Bala Nar | ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप

ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप

मुंबई - जोगेश्वरी पूर्व मतदार संघातील ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांची मतदारसंघात गुंडगिरी सुरू आहे. मंगळवारी रात्री दोनशे कार्यकर्त्यांसह दगडफेक करून दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला. महिलांचा विनयभंग झाला असा गंभीर आरोप शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांनी केला. मातोश्री क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत वायकरांनी उबाठा गटाचे उमेदवार अनंत नर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे केली.

रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर या जोगेश्वरी पूर्व मतदार संघाच्या शिवसेना महायुतीच्या उमेदवार आहेत. याच मतदार संघात मागील काही दिवसांपासून अनंत नर यांची गुंडगिरी सुरू असून मतदारांना धमकावले जात आहे असा आरोप वायकर यांनी केला. वायकर म्हणाले की, मंगळवारी रात्री अनंत नर यांनी दीडशे-दोनशे कार्यकर्ते घेऊन आले आणि शिवीगाळ केली. त्यांच्या कार्यकर्त्यांने महिलांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता महिलांचा व्हिडिओ काढणाऱ्यांनी त्या महिलांचे कपडे फाडून विनयभंग केला. यावेळी कार्यकर्त्यांनी दगडफेक केली तसेच मुलीचा विनयभंग केला. अनंत नर यांचा कार्यकर्ता अमित पेडणेकर याने वायकर जर उबाठा बोललात तर त्यांची जीभ छाटली जाईल अशी खुलेआम धमकी दिली असाही आरोप त्यांनी केला.

तसेच उबाठा उमेदवार अनंत नर यांनी सुनेचा छळ केल्याचे व्हिडिओ क्लिप आहेत. घरगुती हिंसा, सुनेला जाळण्याचा प्रयत्न, भावाच्या बायकोला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न अनंत नर यांनी केला होता. जोगेश्वरीत अशी गुंडगिरी असेल तर आम्ही निवडणूक लढवू शकत नाहीत. इथे सुरक्षित वातावरण नाही. पोलीस आणि निवडणूक आयोगाने या घटनेसंदर्भात ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी वायकर यांनी केली. याप्रकरणी अमित पेडणेकर, विलास जाधव, मंदार मोरे, बाळा सावंत, संदीप कोठारकर आणि एका अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, इथे आठ वेळा निवडणूक लढलो. दंगलग्रस्त जोगेश्वरीचे आम्ही सोन बनवलं. आमच्या प्रचाराबाबत त्यांची काही तक्रार असेल तर त्यांनी कायद्याने पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला तक्रार करावी असंही रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाला म्हटलं आहे. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - In Jogeshwari Constituency Shiv Sena MP Ravindra Waikar made serious allegations against Uddhav Thackeray candidate Bala Nar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.