३५ लाख 'लाडक्या बहिणीं'ची मते महायुतीला की मविआला? राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 10:59 AM2024-10-20T10:59:39+5:302024-10-20T11:01:35+5:30
मुंबईसह राज्यभरात सुरुवातीपासूनच चर्चेत असणारी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत रंगत आणणार.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईसह राज्यभरात सुरुवातीपासूनच चर्चेत असणारी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत रंगत आणणार असून, नुकतेच जमा झालेल्या हप्त्यानंतर आता मुंबईच्या उपनगरातील ३५ लाख ६३ हजार ५९२ लाडक्या बहिणींची मते कुणाच्या पारड्यात पडणार, या राजकीय चर्चेने जोर पकडला आहे.
मुंबईच्या उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरात एकूण मतदारांची संख्या ७६ लाख ५१ हजार ४०६ आहे. यात ८३२ मतदार तृतीयपंथी आहेत. पुरुष मतदारांची संख्या ४० लाख ८६ हजार ९८२ असून, महिला मतदारांची संख्या ३५ लाख ६३ हजार ५९२ आहे. पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या कमी असली तरी कायम चर्चेत राहिलेल्या या लाडक्या बहिणींचे मत कुणाला जाणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष आहे.
विधानसभा पुरुष महिला तृतीयपंथी एकूण
- बोरीवली १६४७६० १५९८३० २ ३२४५९२
- दहिसर १४७०३१ १२९८७७ ४९ २७६९५७
- मागाठाणे १६४२९८ १३९१९१ २ ३०३४१९
- कांदिवली पूर्व १५६१४० १२९६७६ ५ २८५८२१
- चारकोपर १७०३४० १४५५०० १८ ३१५८५८
- मालाड पश्चिम १८७५२२ १६७७०७ ३४० ३५५५६९
- जोगेश्वरी पूर्व १५६९७२ १४१००० १० २९७९८२
- दिंडोशी १७२८८६ १३१९९१ २४ ३०४९०१
- गोरेगाव १७७०९८ १५०५०० १३ ३२७६११
- वर्सोवा १५३३४१ १३१९९७ ३ २८५३४१
- अंधेरी पश्चिम १४८२७० १३८४२९ ७ २८६७०६
- अंधेरी पूर्व १५२८७६ १३३०७८ १ २८५९५५
- मुलुंड १५०९०७ १४४८४६ २२ २९५७७५
- विक्रोळी १२७०६१ ११५८३५ १ २४२८९७
- भांडूप पश्चिम १५४६२८ १३२०४६ ३२ २८६७०६
- घाटकोपर पश्चिम १४६७६७ १२८३१२ ११९ २७५१९८
- घाटकोपर पूर्व १२९६७८ ११८९१७ २२ २४८६१७
- मानखुर्द १८६५१४ १४५७७३ ४६ ३३२३३३
- विलेपार्ले १४२३७४ १३२३१४ ० २७४६८८
- चांदिवली २५२५५९ १९८१५१ १९ ४५०७२९
- कुर्ला १५६८३८ १३३८३१ १२ २९०६८१
- कलिना १२८७६७ ११२०३३ १२ २४०८१२
- वांद्रे पूर्व १३१६२४ ११६७०० २१ २४८३४५
- वांद्रे पश्चिम १४९४४३ १३८२०४ १० २८७६५७
- अणुशक्तीनगर १४३४५९ १२४५२९ ३२ २६८०२०
- चेंबूर १३४८२९ १२३३९७ १० २५८२३६