Join us

मुंबईत ३६ मतदारसंघांत दाखल झालेल्या ६२५ उमेदवारी अर्जांपैकी ४७२ अर्ज ठरले वैध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 7:04 AM

Maharashtra Assembly Election 2024 : वडाळा येथून वंचित बहुजन आघाडीचे संजय जगताप यांचा अर्ज बाद ठरला आहे. मागाठाणेत  उमेदवारी अर्जांची छाननी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : मुंबईच्या ३६ मतदारसंघांत दाखल झालेल्या ६२५ उमेदवारी अर्जांपैकी १५२ उमेदवारी अर्ज बुधवारच्या छाननीमध्ये बाद ठरले, तर ४७२ अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज अवैध ठरलेल्यांमध्ये प्रमुख पक्षांच्या काही उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे विरोधी उमेदवारांचे टेन्शन काही प्रमाणात कमी झाले आहे. काँग्रेसचे मधुकर चव्हाण, जुनैद अब्दुल करीम पटेल आणि शमीम अख्तर अन्सारी (भायखळा), वसिम खान (मानखुर्द) यांनी पक्षाद्वारे दाखल केलेले अर्ज बाद झाले असले, तरी अपक्ष अर्ज वैध ठरले आहेत. वंचितचे फहाद मुजाहिद खान (भायखळा) यांचा अर्ज अवैध ठरला आहे. उद्धवसेनेचे राजेंद्र वाघमारे (मानखुर्द), बाबुराव माने (धारावी), भाजपचे विष्णू गायकवाड (धारावी) यांचेही अर्ज अवैध ठरले आहेत. तर वडाळा येथून वंचित बहुजन आघाडीचे संजय जगताप यांचा अर्ज बाद ठरला आहे. मागाठाणेत  उमेदवारी अर्जांची छाननी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

रायगडमध्ये ११८, पालघरात ७७ अर्ज वैधरायगडमधील सात मतदारसंघांतून एकूण १४० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत ११८ अर्ज वैध ठरविण्यात आले. तर पालघर जिल्ह्यात सहा मतदारसंघांसाठी दाखल ९० पैकी  १३ अर्ज अवैध ठरले आहेत.

ठाणे जिल्ह्यात ४१७ अर्ज वैधठाणे जिल्ह्यात ४९५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी केलेल्या छाननीत ४१७ अर्ज वैध तर ७८ अर्ज अवैध ठरले. ठाणे, मुंब्रा-कळवा, ओवळा-माजिवडा व कोपरी-पाचपाखडी या चार मतदारसंघांतून ८१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी ८ अर्ज अवैध ठरले. ओवळा-माजिवडातील दोन उमेदवारांचे अर्ज पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे रद्द ठरले.  

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूक