‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 06:16 AM2024-10-27T06:16:27+5:302024-10-27T06:24:39+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : पाच वर्षांत १.२ टक्क्यांनी मते घटली, मुंबईकरांची उमेदवारांवर विश्वासवृद्धी
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : मतदानयंत्रावरील वरीलपैकी कोणीही नाही अर्थात नोटा हा पर्याय दाबून राजकीय पक्षांनी उभ्या केलेल्या उमेदवारांना नाकारण्याचा अधिकार मतदारांना निवडणूक आयोगाने बहाल केला आहे. कमीअधिक प्रमाणात मतदार त्यांच्या या अधिकाराचा वापर करतात. सुजाण मुंबईकर मतदारांनी २०१४ ते २०२४ या लोकसभा निवडणूक कालावधीत केलेल्या मतदानाकडे पाहिले असता उपलब्ध आकडेवारीवरून मतदारांनी ‘नोटा’ला नकार दिल्याचे स्पष्ट होते.
मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांतील जवळपास ७५ हजार मतदारांनी ‘नोटा’ चा पर्याय निवडत राजकीय पक्षांविरोधात अविश्वास व्यक्त केला होता. मुंबईतील एकूण मतांच्या तुलनेत ही मते अवघी १.७ टक्के इतकीच आहेत. तत्पूर्वी २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील मतांच्या आकडेवारीनुसार ‘नोटा’चे प्रमाण २.९ टक्के अर्थात १,४२,००९ मते एवढी होती. त्यामुळे पाच वर्षांत मतदारांचा उमेदवारांवरील विश्वास वाढल्याचा निष्कर्ष समोर येत आहे.
मुंबईतील एकूण नोटाची मतेनिवडणूक आयोगाच्या नियमानुसार, एखाद्या मतदारसंघात ‘नोटा’चे प्रमाण सर्वाधिक असल्यास दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवारास विजयी घोषित करण्यात येते.
लोकसभा मतदारसंघात झालेले मतदान
मुंबई उत्तर
वर्ष एकूण ‘नोटा’ची नोटा
मते मते %
२०२४ १०,३२,५०३ १३,२४८ १.३
२०१९ ८,९५,७८२ ३०,३६३ ३.४
२०१४ ९,५९,५९५ १०,९८३ १.१
मुंबई उत्तर पश्चिम
२०२४ ८,६०,०९९ १५,०३६ १.६
२०१९ ९,५१,५८२ २९,२२२ ३.४
२०१४ ८,९८,४८९ ११,४७७ १.३
मुंबई उत्तर पूर्व
२०२४ ९,२२,२५६ १०,०८८ १.१
२०१९ ८,६२,०७९ १९,५७० २.३
२०१४ ८,९४,५६९ ११,८२१ १.३
मुंबई उत्तर मध्य
वर्ष एकूण ‘नोटा’ची नोटा
मते मते %
२०२४ ९,०७,२२९ ९,६६५ १.१
२०१९ ८,३५,३३५ २१,२५८ २.५
२०१४ ८,६८,८९६ ११,५४५ १.३
मुंबई दक्षिण मध्य
२०२४ ७,९८,३३८ १३,३१६ १.७
२०१९ ७,५३,७०४ १८,३४० २.४
२०१४ ७,८४,०७६ ११,९०६ १.५
मुंबई दक्षिण
२०२४ ७,६९,२२४ १३,२९० १.७
२०१९ ७,२८,६५४ २३,२५६ ३.२
२०१४ ७,९३,२२५ ८,५९२ १.१