Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : मतदानयंत्रावरील वरीलपैकी कोणीही नाही अर्थात नोटा हा पर्याय दाबून राजकीय पक्षांनी उभ्या केलेल्या उमेदवारांना नाकारण्याचा अधिकार मतदारांना निवडणूक आयोगाने बहाल केला आहे. कमीअधिक प्रमाणात मतदार त्यांच्या या अधिकाराचा वापर करतात. सुजाण मुंबईकर मतदारांनी २०१४ ते २०२४ या लोकसभा निवडणूक कालावधीत केलेल्या मतदानाकडे पाहिले असता उपलब्ध आकडेवारीवरून मतदारांनी ‘नोटा’ला नकार दिल्याचे स्पष्ट होते.
मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांतील जवळपास ७५ हजार मतदारांनी ‘नोटा’ चा पर्याय निवडत राजकीय पक्षांविरोधात अविश्वास व्यक्त केला होता. मुंबईतील एकूण मतांच्या तुलनेत ही मते अवघी १.७ टक्के इतकीच आहेत. तत्पूर्वी २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील मतांच्या आकडेवारीनुसार ‘नोटा’चे प्रमाण २.९ टक्के अर्थात १,४२,००९ मते एवढी होती. त्यामुळे पाच वर्षांत मतदारांचा उमेदवारांवरील विश्वास वाढल्याचा निष्कर्ष समोर येत आहे.
मुंबईतील एकूण नोटाची मतेनिवडणूक आयोगाच्या नियमानुसार, एखाद्या मतदारसंघात ‘नोटा’चे प्रमाण सर्वाधिक असल्यास दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवारास विजयी घोषित करण्यात येते.
लोकसभा मतदारसंघात झालेले मतदानमुंबई उत्तरवर्ष एकूण ‘नोटा’ची नोटा मते मते %२०२४ १०,३२,५०३ १३,२४८ १.३२०१९ ८,९५,७८२ ३०,३६३ ३.४२०१४ ९,५९,५९५ १०,९८३ १.१
मुंबई उत्तर पश्चिम२०२४ ८,६०,०९९ १५,०३६ १.६२०१९ ९,५१,५८२ २९,२२२ ३.४२०१४ ८,९८,४८९ ११,४७७ १.३
मुंबई उत्तर पूर्व २०२४ ९,२२,२५६ १०,०८८ १.१२०१९ ८,६२,०७९ १९,५७० २.३२०१४ ८,९४,५६९ ११,८२१ १.३मुंबई उत्तर मध्य वर्ष एकूण ‘नोटा’ची नोटा मते मते %२०२४ ९,०७,२२९ ९,६६५ १.१२०१९ ८,३५,३३५ २१,२५८ २.५२०१४ ८,६८,८९६ ११,५४५ १.३ मुंबई दक्षिण मध्य २०२४ ७,९८,३३८ १३,३१६ १.७२०१९ ७,५३,७०४ १८,३४० २.४२०१४ ७,८४,०७६ ११,९०६ १.५
मुंबई दक्षिण २०२४ ७,६९,२२४ १३,२९० १.७२०१९ ७,२८,६५४ २३,२५६ ३.२२०१४ ७,९३,२२५ ८,५९२ १.१