Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 08:59 AM2024-11-23T08:59:09+5:302024-11-23T09:00:55+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघांतर्गत येणारा दहिसर विधानसभा मतदारसंघ गेल्या दहा वर्षांपासून भाजपकडे आहे. २०१४ मध्ये शिवसेना-भाजप युती तुटली. याचा फायदा भाजपला दहिसरमध्ये मिळाला होता.
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघांतर्गत येणारा दहिसर विधानसभा मतदारसंघ गेल्या दहा वर्षांपासून भाजपकडे आहे. २०१४ मध्ये शिवसेना-भाजप युती तुटली. याचा फायदा भाजपला दहिसरमध्ये मिळाला होता. ही जागा शिवसेनेच्या ताब्यात होती. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपला या ठिकाणी यश मिळालं. सध्या या मतदारसंघात भाजपची चांगली पकड आहे. दहिसरमध्ये गेल्या दहा वर्षांत भाजपने आपली ताकद वाढवली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये या ठिकाणाहून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर असल्याचं दिसून आलंय. तर शिवसेनेचे विनोद घोसाळकर पिछाडीवर आहेत.
२००९ मध्ये शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर दहिसरमधून विजयी झाले होते. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे घोसाळकर यांना त्या निवडणुकीत ६० हजार मते मिळाली होती. त्यांनी काँग्रेसच्या योगेश दुबे यांचा १६ हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत मनसेच्या दीपा पाटील यांना २२ हजार मते मिळाली गोती. त्यामुळे घोसाळकर यांच्या मतांची टक्केवारी कमी झाली.
२०१४ मध्ये मनीषा चौधरींचा विजय
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. शिवसेना-भाजप युती तुटली. काँग्रेस, राष्ट्रवादीनंही स्वबळावर निवडणूक लढवली. सर्वच पक्ष स्वबळावर लढले असल्यानं मोठा फरक पडला. मोदी लाटेचा फायदा भाजपला झाला. मनीषा चौधरी यांनी शिवसेनेच्या घोसाळकर यांचा ३८ हजार ५७८ मतांनी पराभव केला.
२०१९ मध्ये दुसऱ्यांदा विजय
२०१९ च्या शिवसेना-भाजप युतीत दहिसरची जागा भाजपच्या खात्यात गेली. भाजपनं विद्यमान आमदार मनीषा चौधरी यांना संधी दिली. त्यांनी काँग्रेसच्या अरुण सावंत यांचा सुमारे ६४ हजार मतांनी पराभव केला. या जागेवर आता भाजपची मजबूत पकड आहे. दहिसरमधून आमदार होण्यापूर्वी चौधरी या डहाणू नगरपालिकेच्या महापौर होत्या. तसंच ठाणे ग्रामीणच्या भाजप अध्यक्षपदाचं कामही त्यांनी पाहिलंय.