"फॉर्म १७-सी भाग दोनसह ही कागदपत्रे उमेदवार प्रतिनिधीला त्वरित द्या’’, नाना पटोलेंचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 3:24 PM
Maharashtra Assembly Election 2024: मतदानादिवशीचा फॉर्म १७-सी भाग दोन, फेरीनिहाय तक्ता (परिशिष्ट-५७) व अंतिम निकाल (फॉर्म-२०) पडताळणीसाठी याची प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित देण्यात यावी अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविले आहे.