Join us

शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2024 5:16 AM

Maharashtra Assembly Election 2024 : सावंत यांनी महिलांची प्रतिष्ठा जपली नसल्याचे म्हणत शायना यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. नागपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ७९ आणि ३५६(२) अन्वये गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : मुंबादेवी येथील शिंदेसेनेच्या उमेदवार शायना एन.सी. यांचा ‘इम्पोर्टेड माल’ असा वादग्रस्त उल्लेख केल्याने उद्धवसेनेचे खा. अरविंद सावंत अडचणीत आले आहेत. सावंत यांनी महिलांची प्रतिष्ठा जपली नसल्याचे म्हणत शायना यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. नागपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ७९ आणि ३५६(२) अन्वये गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. 

एका वृत्तसंस्थेशी बोलताना, ‘त्यांची अवस्था बघा, आयुष्यभर भाजपमध्ये राहिलेल्या आता दुसऱ्या पक्षात गेल्या आहेत. येथे ‘इम्पोर्टेड माल’ चालत नाही, फक्त ओरिजनल माल येथे चालतो’, असे वक्तव्य खा. सावंत यांनी केले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत. सावंत यांनी माफी मागावी, अशी मागणी शायना यांनी केली आहे. ते स्त्रीचा आदर करू शकत नाहीत. मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे, असेही त्या म्हणाल्या. गदारोळ झाल्यानंतर खा. सावंत यांनी आपण कोणत्याही महिलेचा अपमान केला नसल्याचा दावा केला आहे.

राज ठाकरे यांची भेटशायना यांनी शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थवर भेट घेतली. या भेटीसंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता, त्या म्हणाल्या, आमचे कौटुंबिक संबंध आहेत. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.

आयोगाने कारवाई करावी : डॉ. नीलम गोऱ्हे‘माल’ शब्द वापरणे हा महिला वर्गाचा अपमान आहे. निवडणूक आयोगाने खा. सावंत यांच्याविरोधात त्वरित कारवाई करायला हवी. सावंत यांनी विनाविलंब माफी मागायला हवी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती व शिंदेसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकअरविंद सावंतमुंबादेवी