Join us

शिंदेसेनेच्या दोन जागा मित्रपक्षांना; मुंबादेवीत शायना एन.सी., कल्याण ग्रामीणमध्ये राजेश मोरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 10:41 AM

Maharashtra Assembly Election 2024 : भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या कन्नडमधून शिंदेसेनेच्या उमेदवार असतील. भाजपच्या नेत्या शायना एन.सी. यांना मुंबादेवी मतदारसंघात शिंदेसेनेने उमेदवारी दिली.

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिंदेसेनेने सोमवारी १५ उमेदवार जाहीर केले. त्यातील दोन जागा या मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. जनसुराज्य पक्षाचे अशोकराव माने हातकणंगलेतून तर राजर्षी शाहू विकास आघाडीचे राजेंद्र यड्रावकर हे शिरोळमधून लढतील. भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या कन्नडमधून शिंदेसेनेच्या उमेदवार असतील. भाजपच्या नेत्या शायना एन.सी. यांना मुंबादेवी मतदारसंघात शिंदेसेनेने उमेदवारी दिली. आधी त्या भाजपकडून वरळीतून लढण्याची चर्चा होती, पण ती जागा शिंदेसेनेचे मिलिंद देवरा यांना देण्यात आली. 

बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली. करमाळामध्ये दिग्विजय बागल यांना उमेदवारी दिली. ते माजी आमदार दिवंगत दिगंबर बागल यांचे पुत्र आहेत. दिग्विजय यांच्या भगिनी रश्मी बागल भाजपच्या नेत्या आहेत. संगमनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरुद्ध माजी खा. भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील लढण्याची शक्यता संपली आहे. ही जागा शिंदेसेनेकडे गेली. तेथे अमोल खताळ हे उमेदवार असतील.

सिंदखेडराजामध्ये मंत्री राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. ही जागा महायुतीत अजित पवार गटाकडे जाईल आणि तेथे शिंगणे यांची पुतणी गायत्री  उमेदवार असतील असे मानले जात असतानाच ही जागा शिंदेसेनेकडे गेली. तेथे शिवसेनेचे माजी आ. शशिकांत खेडेकर लढतील. श्रीरामपूरमध्ये आमदार लहू कानडे यांनी सोमवारी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनाच उमेदवारी मिळणार असे मानले जात असतानाच ही जागा शिंदेसेनेकडे गेली आणि त्यांनी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली. 

शिंदेसेनेची उमेदवार यादी मतदारसंघ    उमेदवाराचे नाव                             सिंदखेडराजा    शशिकांत खेडेकर    माजी आमदार घनसावंगी    हिकमत उढाण    नवीन चेहरा  कन्नड    संजना जाधव    नवीन चेहरा        (भाजप नेते रावसाहेब दानवेंची कन्या) कल्याण ग्रामीण    राजेश मोरे    नवीन चेहरा - शहरप्रमुख भांडुप पश्चिम    अशोक पाटील    नवीन चेहरा मुंबादेवी    शायना एन.सी.    भाजपतून प्रवेश संगमनेर    अमोल खताळ    भाजपतून प्रवेश श्रीरामपूर    भाऊसाहेब कांबळे    माजी आमदार नेवासा    विठ्ठलराव पाटील    जि.प. माजी अध्यक्ष-भाजपतून प्रवेश धाराशिव    अजित पिंगळे    भाजपतून प्रवेश करमाळा    दिग्विजय बागल    भाजपतून प्रवेश बार्शी    राजेंद्र राऊत    विद्यमान आमदार गुहागर    राजेश बेंडल    नवीन चेहरा मित्र पक्षाचे उमेदवार हातकणंगले    अशोकराव माने    जनसुराज्य पक्ष शिरोळ    राजेंद्र येड्रावरकर    राजर्षी शाहू विकास आघाडी

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकशिवसेना