मुंबईतल्या २२ जागांवर उद्धवसेनेची नजर? नावे ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 08:41 AM2024-09-06T08:41:03+5:302024-09-06T08:41:49+5:30
Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असताना उद्धवसेनेने २२ जागांवर उमेदवार ठरविले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काही मतदारसंघांमध्ये केवळ एक तर काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक नावांचे पर्याय उद्धव ठाकरे यांनी तयार ठेवले आहेत.
मुंबई - महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असताना उद्धवसेनेने २२ जागांवर उमेदवार ठरविले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काही मतदारसंघांमध्ये केवळ एक तर काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक नावांचे पर्याय उद्धव ठाकरे यांनी तयार ठेवले आहेत.
मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. उद्धवसेनेला महाविकास आघाडीत त्यातील मोठा वाटा मिळेल, असे म्हटले जात असतानाच खा. वर्षा गायकवाड, नसिम खान, भाई जगताप आदी नेत्यांनी किमान २० ते २२ जागा काँग्रेसने लढाव्यात, असा दबाव आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर वाढविला आहे. त्यातच शरद पवार गटालाही मुंबईत आठ जागा हव्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईबाबत निर्णय करताना मविआची कसरत होणार आहे. काही विद्यमान आमदार, जुने-नवे चेहरे उद्धव सेनेच्या २२ जागांमध्ये आहेत.
विधानसभानिहाय ही नावे चर्चेत
२०१९मध्ये शिवसेनेने मुंबईत १४ जागा जिंकल्या आहेत. विधानसभेसाठी जी यादी उद्धव ठाकरे यांनी तयार केल्याची चर्चा आहे ती अशी - वरळी मतदारसंघ - आदित्य ठाकरे, दहिसर - तेजस्विनी घोसाळकर, वांद्रे पूर्व - वरुण सरदेसाई, दिंडोशी - सुनील प्रभू, विक्रोळी - सुनील राऊत, अंधेरी पूर्व - ऋतुजा लटके, कलिना - संजय पोतनीस, कुर्ला - प्रवीणा मोरजकर, वडाळा - श्रद्धा जाधव, जोगेश्वरी - अमोल कीर्तिकर, चारकोप - नीरव बारोट, गोरेगाव - समीर देसाई, भांडुप - रमेश कोरगावकर, चांदिवली - ईश्वर तायडे, दादर-माहिम - सचिन अहिर / विशाखा राऊत, वर्सोवा - राजू पेडणेकर / राजूल पटेल, शिवडी - अजय चौधरी / सुधीर साळवी, भायखळा - किशोरी पेडणेकर / मनोज जामसुतकर / रहाटे, चेंबूर - अनिल पाटणकर / प्रकाश फातर्पेकर, अणुशक्तीनगर - विठ्ठल लोकरे / प्रमोद शिंदे, घाटकोपर - सुरेश पाटील, मागाठाणे - विलास पोतनीस / सुदेश पाटेकर/ संजना घाडी