Join us

...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 9:22 AM

Maharashtra Assembly Election 2024: एका सभेला संबोधित करत असताना भाषणादरम्यानच फटाके वाजवण्यात आल्याने राज ठाकरे हे चांगलेच संतापले. त्यांनी हे फटाके जर कुणी मुद्दाम वाजवले असतील, तर त्याच्या कानाखाली फटाके वाजवा, असा इशारा दिला. 

विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून देण्यासाठी राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने यावेळी जोरदार तयारी केली आहे. तसेच राज ठाकरे यांनीही मनसेचे उमेदवार लढत असलेल्या मतदारसंघांमध्ये सभांचा धडाका लावला आहे. दरम्यान, एका सभेला संबोधित करत असताना भाषणादरम्यानच फटाके वाजवण्यात आल्याने राज ठाकरे हे चांगलेच संतापले. त्यांनी हे फटाके जर कुणी मुद्दाम वाजवले असतील, तर त्याच्या कानाखाली फटाके वाजवा, असा इशारा दिला. 

त्याचं झालं असं की, राज ठाकरे यांचं भाषण ऐन रंगात आलं असताना फटाक्यांच्या आतषबाजीला सुरुवात झाली. फटाक्यांच्या आवाजामुळे राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये खंड पडला. त्यांना थोडावेळ भाषण थांबवावं लागलं. त्यामुळे संतप्त झालेल्या राज ठाकरे यांनी जर कुणी मुद्दामहून फटाके वाजवले असतील तर आताच कानाखाली आवाज काढा, यांच्या कानाखाली फटाके वाजवले तरी चालतील, अशी सूचना कार्यकर्त्यांना दिली.   

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४राज ठाकरेमनसेमुंबई