मुंबईत उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना ‘काँटे की टक्कर’, ११ मतदारसंघांमध्ये थेट सामना, उमेदवारांचा कस लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 09:39 AM2024-10-31T09:39:49+5:302024-10-31T09:41:07+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर दोन्ही गट विरोधात लढले होते. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेतही होणार आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीत मुंबईत उद्धवसेना २०, तर शिंदेसेना १४ जागा लढवीत आहे. यातील ११ मतदारसंघांत उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना असा थेट सामना होणार आहे. मुंबईकरांचा कौल कोणत्या सेनेला याचे चित्र निकालानंतर स्पष्ट होईल. लोकसभेत काँग्रेसने सर्वाधिक १३ जिंकल्या. भाजप आणि उद्धवसेनेने ९ आणि शिंदेसेनेने ७ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर दोन्ही गट विरोधात लढले होते. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेतही होणार आहे.
शिंदेसेनेच्या मुंबईतील सहा आमदारांपैकी रवींद्र वायकर हे लोकसभेत निवडून गेल्याने ती जागा रिक्त आहे. या सहांपैकी चांदीवली वगळता अन्य पाच मतदारसंघांत दोन्ही सेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात लढणार आहेत. उद्धवसेनेचे मुंबईत ८ आमदार आहेत. त्यांपैकी सहा आमदारांच्या विरोधात शिंदेसेनेने उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळेल.
मतदारसंघ शिंदेसेना उद्धवसेना
मागाठणे आ. प्रकाश सुर्वे उदेश पाटेकर
विक्रोळी सुवर्णा करंजे आ. सुनील राऊत
भांडुप पश्चिम अशोक पाटील आ. रमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्व मनीषा वायकर अनंत (बाळा) नर
दिंडोशी संजय निरुपम आ. सुनील प्रभू
अंधेरी पूर्व मूरजी पटेल आ. ऋतुजा लटके
चेंबुर तुकाराम काते आ. प्रकाश फातर्पेकर
कुर्ला आ. मंगेश कुडाळकर प्रवीणा मोरजकर
माहिम आ. सदा सरवणकर महेश सावंत
वरळी मिलिंद देवरा आ. आदित्य ठाकरे
भायखळा आ. यामिनी जाधव मनोज जामसुतकर