Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीत मुंबईत उद्धवसेना २०, तर शिंदेसेना १४ जागा लढवीत आहे. यातील ११ मतदारसंघांत उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना असा थेट सामना होणार आहे. मुंबईकरांचा कौल कोणत्या सेनेला याचे चित्र निकालानंतर स्पष्ट होईल. लोकसभेत काँग्रेसने सर्वाधिक १३ जिंकल्या. भाजप आणि उद्धवसेनेने ९ आणि शिंदेसेनेने ७ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर दोन्ही गट विरोधात लढले होते. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेतही होणार आहे.
शिंदेसेनेच्या मुंबईतील सहा आमदारांपैकी रवींद्र वायकर हे लोकसभेत निवडून गेल्याने ती जागा रिक्त आहे. या सहांपैकी चांदीवली वगळता अन्य पाच मतदारसंघांत दोन्ही सेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात लढणार आहेत. उद्धवसेनेचे मुंबईत ८ आमदार आहेत. त्यांपैकी सहा आमदारांच्या विरोधात शिंदेसेनेने उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळेल.
मतदारसंघ शिंदेसेना उद्धवसेना मागाठणे आ. प्रकाश सुर्वे उदेश पाटेकरविक्रोळी सुवर्णा करंजे आ. सुनील राऊतभांडुप पश्चिम अशोक पाटील आ. रमेश कोरगावकरजोगेश्वरी पूर्व मनीषा वायकर अनंत (बाळा) नर दिंडोशी संजय निरुपम आ. सुनील प्रभूअंधेरी पूर्व मूरजी पटेल आ. ऋतुजा लटकेचेंबुर तुकाराम काते आ. प्रकाश फातर्पेकर कुर्ला आ. मंगेश कुडाळकर प्रवीणा मोरजकरमाहिम आ. सदा सरवणकर महेश सावंतवरळी मिलिंद देवरा आ. आदित्य ठाकरेभायखळा आ. यामिनी जाधव मनोज जामसुतकर