राज्यात विधानसभा निवडणूक कधी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले मोठे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 08:13 AM2024-09-04T08:13:19+5:302024-09-04T08:14:38+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणूक कधी होणार, याचा अंदाज देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तवला आहे.  

Maharashtra Assembly Election 2024 : When is the assembly election in the state? Chief Minister Eknath Shinde gave a big signal | राज्यात विधानसभा निवडणूक कधी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले मोठे संकेत

राज्यात विधानसभा निवडणूक कधी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले मोठे संकेत

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र, विधानसभा निवडणूक कधी होणार, याकडे राज्याचं लक्ष आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले आहेत. तसेच, विधानसभा निवडणूक कधी होणार, याचा अंदाज देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तवला आहे.  

चांदीवली येथील मिठी नदी शेजारील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील क्रांतीनगर व संदेश नगर येथील प्रकल्प बाधित झोपडपट्टीधारकांचे एचडीएल संकुल, कुर्ला येथे बांधलेल्या इमारतीत पुनर्वसनासाठी दिलेल्या सदनिकेच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

या कार्यक्रमात राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. येत्या दोन महिन्यानंतर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणुका होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच, यावेळी चांदिवली विधानसभा मतदारसंघातून दिलीप लांडे यांना निवडून देण्याचं आवाहन देखिल एकनाथ शिंदे यांनी केले. 

याचबरोबर, मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईकर मुंबई बाहेर गेला आहे. त्यांना परत मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

चांदीवलीतील प्रकल्प बाधित झोपडपट्टी धारकांना आज ४०० घरांच्या चाव्या देण्यात येत आहेत. हे सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी निर्णय घेणारे हे सरकार आहे. त्यामुळे विकास कामाबरोबरच कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या शासनाने गेल्या दोन वर्षात विकास आणि कल्याण यांची सांगड घालण्याचे काम केले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवली - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवली आहे. पुढील काळात १५०० रुपयाची रक्कम वाढविण्यात येईल. या बरोबरच महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. तरुणांसाठी युवा कौशल्य प्रशिक्षण योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री व मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना सुरू केल्या आहेत. तसेच, शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज मिळावी म्हणून मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत पाच लाखापर्यंत चे मोफत उपचार देण्यात येत आहे. सर्वसामान्यांचे आयुष्यात चांगले दिवस यावेत म्हणून या कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता
दरम्यान, महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणूक हरियाणासोबत झालेली होती. पण यंदा हरियाणात विधानसभेची निवडणूक आधी होणार आहे. या निवडणुकीचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेलं आहे. हरियाणा, जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला आहे. मात्र, महाराष्ट्रातील विधानसभेच्या तारख्या अद्याप जाहीर करण्यात आल्या नाही. दरम्यान, येत्या नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : When is the assembly election in the state? Chief Minister Eknath Shinde gave a big signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.