मनसे उमेदवारांमुळे कुणाचा फायदा? ५४ पैकी ४१ मतदारसंघांमध्ये तिरंगी लढती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 04:48 PM2024-11-09T16:48:32+5:302024-11-09T16:52:31+5:30

Maharashtra Assembly Election 2024: मुंबईतील ३६ आणि ठाणे जिल्ह्यातील १८ अशा एकूण ५४ मतदारसंघांपैकी ४१ जागांवर महाविकास आघाडी, महायुती आणि मनसे अशी तिरंगी लढत होत आहे.

Maharashtra Assembly Election 2024: Who benefits from MNS candidates? Three-way contests in 41 out of 54 constituencies | मनसे उमेदवारांमुळे कुणाचा फायदा? ५४ पैकी ४१ मतदारसंघांमध्ये तिरंगी लढती

मनसे उमेदवारांमुळे कुणाचा फायदा? ५४ पैकी ४१ मतदारसंघांमध्ये तिरंगी लढती

 मुंबई - मुंबईतील ३६ आणि ठाणे जिल्ह्यातील १८ अशा एकूण ५४ मतदारसंघांपैकी ४१ जागांवर महाविकास आघाडी, महायुती आणि मनसे अशी तिरंगी लढत होत आहे. महाविकास आघाडीने मुंबईत उद्धवसेना (२२), काँग्रेस (११), शरद पवार गट (२) आणि समाजवादी पक्ष (१) असे उमेदवार दिले आहेत. तर, महायुतीने भाजप (१८), शिंदेसेना (१४), अजित पवार गट (३) असे ३५ उमेदवार दिले आहेत. 

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभांसाठी मविआने उद्धवसेना (१०), काँग्रेस (२), शरद पवार गट (५), सपा (१) असे उमेदवार उभे केले आहेत. तर, महायुतीचेही भाजप (९), शिंदेसेना (७), अजित पवार गट (२) असे उमेदवार दिले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही मुंबईत २७ आणि ठाण्यात १४ उमेदवार दिले आहेत. मात्र, हे उमेदवार भाजपच्या फायद्याचे  ठरतील का शिंदेसेनेच्या? हा कळीचा मुद्दा ठरला आहे. मनसे किती मते घेणार  यापेक्षा कोणाची मते घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

उद्धवसेना, भाजप, मनसे लढत
मुंबईत : १) वडाळा २) घाटकोपर पश्चिम ३) कलिना ४) विलेपार्ले ५) वर्सोवा ६) गोरेगाव ७) दहीसर ८) बोरिवली
ठाण्यात : १) ठाणे, २) ऐरोली, ३) उरण 

उद्धवसेना, शिंदेसेना, मनसे लढत
मुंबईत
: १) वरळी, २) माहीम, ३) चेंबूर, ४) भांडुप पश्चिम, ५) विक्रोळी, ६) कुर्ला, ७) दिंडोशी, ८) जोगेश्वरी पूर्व, ९) मागाठाणे 
ठाण्यात : १) ओवळा माजीवडा, २) कल्याण ग्रामीण ३) भिवंडी ग्रामीण ४) कल्याण पश्चिम ५) पालघर ६) बोईसर ७) कर्जत

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Who benefits from MNS candidates? Three-way contests in 41 out of 54 constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.