मुंबई - मुंबईतील ३६ आणि ठाणे जिल्ह्यातील १८ अशा एकूण ५४ मतदारसंघांपैकी ४१ जागांवर महाविकास आघाडी, महायुती आणि मनसे अशी तिरंगी लढत होत आहे. महाविकास आघाडीने मुंबईत उद्धवसेना (२२), काँग्रेस (११), शरद पवार गट (२) आणि समाजवादी पक्ष (१) असे उमेदवार दिले आहेत. तर, महायुतीने भाजप (१८), शिंदेसेना (१४), अजित पवार गट (३) असे ३५ उमेदवार दिले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभांसाठी मविआने उद्धवसेना (१०), काँग्रेस (२), शरद पवार गट (५), सपा (१) असे उमेदवार उभे केले आहेत. तर, महायुतीचेही भाजप (९), शिंदेसेना (७), अजित पवार गट (२) असे उमेदवार दिले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही मुंबईत २७ आणि ठाण्यात १४ उमेदवार दिले आहेत. मात्र, हे उमेदवार भाजपच्या फायद्याचे ठरतील का शिंदेसेनेच्या? हा कळीचा मुद्दा ठरला आहे. मनसे किती मते घेणार यापेक्षा कोणाची मते घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
उद्धवसेना, भाजप, मनसे लढतमुंबईत : १) वडाळा २) घाटकोपर पश्चिम ३) कलिना ४) विलेपार्ले ५) वर्सोवा ६) गोरेगाव ७) दहीसर ८) बोरिवलीठाण्यात : १) ठाणे, २) ऐरोली, ३) उरण
उद्धवसेना, शिंदेसेना, मनसे लढतमुंबईत : १) वरळी, २) माहीम, ३) चेंबूर, ४) भांडुप पश्चिम, ५) विक्रोळी, ६) कुर्ला, ७) दिंडोशी, ८) जोगेश्वरी पूर्व, ९) मागाठाणे ठाण्यात : १) ओवळा माजीवडा, २) कल्याण ग्रामीण ३) भिवंडी ग्रामीण ४) कल्याण पश्चिम ५) पालघर ६) बोईसर ७) कर्जत