विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत ४२० उमेदवार मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 12:46 PM2024-11-05T12:46:41+5:302024-11-05T12:47:22+5:30

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मुंबईत ६५ उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले. त्यात शहरातील १२ तर उपनगरांतील ५३ उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे आता मुंबईत ३६ मतदारसंघांत एकूण ४२० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

Maharashtra Assembly Election 2024:420 candidates in Mumbai | विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत ४२० उमेदवार मैदानात

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत ४२० उमेदवार मैदानात

 मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मुंबईत ६५ उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले. त्यात शहरातील १२ तर उपनगरांतील ५३ उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे आता मुंबईत ३६ मतदारसंघांत एकूण ४२० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी काही ठिकाणी बंडखोरांची मनधरणी करण्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांना यश आले. तर काही ठिकाणी पक्षांच्या मनसुब्यांवर अपक्षांनी पाणी फेरले. मुंबई शहरात १०५ आणि उपनगरांत ३१५ उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले आहेत. मुंबईतील ३६ पैकी केवळ शिवडी मतदारसंघामध्ये महायुतीने उमेदवार दिला नव्हता. पण, येथून भाजपचे मुंबई उपाध्यक्ष नाना आंबोले यांनी अर्ज भरला होता. अपक्ष उमेदवार म्हणून ते उद्धवसेनेचे अजय चौधरी आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांना लढत देणार आहेत.

मानखुर्दमध्ये काँग्रेसचे वसीम खान यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे. त्यांची लढत सपाचे आ. अबू आझमी आणि अजित पवार गटाचे आ. नवाब मलिक यांच्याशी होणार आहे. अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे  चेंबूरमध्ये सर्वांत कमी म्हणजे ६ उमेदवार तर सर्वाधिक  मानखुर्द/शिवाजीनगर आणि जोगेश्वरी या मतदारसंघात २२ उमेदवार रिंगणात आहेत.

६५ जणांची माघार, बंडखोरी शमविण्यात काही प्रमाणात यश
मतदारसंघ    उमेदवार
मानखुर्द शिवाजीनगर    
जोगेश्वरी (प्रत्येकी)    २२ 
दिंडोशी    १९ 
मालाड प.    १८
कलीना, वर्सोवा (प्रत्येकी)    १६
वांद्रे पूर्व,     
सायन काेळीवाडा (प्रत्येकी)     १५
भायखळा, कुर्ला (प्रत्येकी)    १४ 
कुलाबा, गोरेगाव     
विक्रोळी (प्रत्येकी)    १३ 
घाटकोपर प., अंधेरी पू.          
भांडुप, धारावी (प्रत्येकी)    १२
मुंबादेवी, चांदिवली (प्रत्येकी)    ११ 
वरळी, वांद्रे प.,      
मुलुंड, दहिसर (प्रत्येकी)    १०
वडाळा, अणुशक्ती नगर,     
चारकोप, कांदिवली (प्रत्येकी)    ९    
मलबार हिल, घाटकोपर पू.    
अंधेरी प., मागाठाणे (प्रत्येकी)    ८
शिवडी, बोरिवली (प्रत्येकी)    ७ 
माहीम ,चेंबूर       
विलेपार्ले (प्रत्येकी)    ६

Web Title: Maharashtra Assembly Election 2024:420 candidates in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.