चारकोपमध्येही भाजपची सरशी, योगेश सागर यांचा विजय जवळपास निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 02:23 PM2024-11-23T14:23:11+5:302024-11-23T14:25:21+5:30

Maharashtra Assembly Election Result 2024:  चारकोप विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ देखील भाजपचा गड मानला जातो.

Maharashtra Assembly Election Result 2024 BJP s charkop vidhansabha Yogesh Sagar s victory in Charkop is almost certain maharashtra election | चारकोपमध्येही भाजपची सरशी, योगेश सागर यांचा विजय जवळपास निश्चित

चारकोपमध्येही भाजपची सरशी, योगेश सागर यांचा विजय जवळपास निश्चित

Maharashtra Assembly Election Result 2024:  चारकोप विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ देखील भाजपचा गड मानला जातो. योगेश सागर हे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चारकोप विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडणूक लढवत होते. काँग्रेसने यशवंत सिंग यांच्यासारख्या नवख्या व्यक्तीला या भागात उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार योगेश सागर यांचा विजय झाल्याची माहिती समोर आलीये. याची अधिकृत घोषणा अद्याप होणं बाकी आहे.

या मतदारसंघात सुमारे २० टक्के उत्तर भारतीय मतदार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिनेश साळवी यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, योगेश सागर यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ६४ हजार ३६७ मतांनी तर २०१९ च्या निवडणुकीत ७३ हजार ७४९ मतांनी विजय मिळवला होता. यावेळीही ते मोठ्या फरकाने ते विजयी झाल्याचं समोर येत आहे.

२००९/१४ ची स्थिती काय?

२००९ पासून भारतीय जनता पक्षाचे योगेश सागर सलग तिसऱ्यांदा चारकोप विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत योगेश सागर यांनी ७१ टक्के मतं मिळवून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. त्यांच्याविरोधात लढलेले काँग्रेसचे कालू बुधलिया यांचा सुमारे ७३ हजार मतांनी पराभव झाला.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत योगेश सागर यांनी ६० टक्के मते मिळवून ६५ हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यावेळी शिवसेना-भाजप स्वतंत्र लढल्यामुळे मतविभागणी होऊनही शिवसेनेच्या शुभदा गुडेकर यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. काँग्रेसचे भरत पारेख तिसऱ्या तर मनसेचे दीपक देसाई चौथ्या क्रमांकावर होते.

Web Title: Maharashtra Assembly Election Result 2024 BJP s charkop vidhansabha Yogesh Sagar s victory in Charkop is almost certain maharashtra election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.