Maharashtra Election 2019: काहीही हं ओवैसी... म्हणे एका दिवसात 15 बॉटल रक्तदान केलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 10:51 AM2019-10-20T10:51:35+5:302019-10-20T10:52:49+5:30
Maharashtra Election 2019: एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत.
मुंबईः एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत. ओवैसी यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक विधान केलं होतं, त्यानंतर सोशल मीडियातून ओवैसींची खिल्ली उडवण्यात आली आहे. एका प्रचारसभेत ओवैसी म्हणाले होते की, मी एका दिवसात 15 बॉटल रक्तदान केलं, त्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका केली जात आहे.
ओवैसींच्या एका दिवसात 15 बॉटल रक्तदान केल्याच्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. त्यानंतर सोशल मीडियावरून त्यांचा नेटकऱ्यांनी खरपूस समाचार घेतला. या व्हिडीओत ते म्हणतात, मी फक्त रक्तदानच केलं नाही, तर रक्त देण्यासाठी हैदराबादेतल्या उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये पीडित रुग्णाच्या बिछान्यापर्यंत पळत गेलो होतो.
ओवैसींच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर आता अनेक हास्यास्पद प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एकानं युजर्सनं ट्विट करत म्हटलं आहे की, एका वयोवृद्ध माणसाच्या शरीरात 4,500 ते 5,700 मिलीलीटर रक्त असतं. एका युनिट बॉटल रक्ताची मात्रा ही 525 मिलीलीटर असते. 15 युनिट रक्त म्हणजे 7875 मिलीलीटर झालं.Average blood volume in an adult ranges from 4500-5700ml.
— NIRUPAM (@NIRUPAMACHARJE1) October 18, 2019
One unit (bottle) of blood = 525ml.
15 Units of Blood = 7875 ml. Owaisi@asadowaisi telling he donated 15 bottles of blood & delivered himself !!
Insallah..... even Allah can not defend this, forget Medical Science. pic.twitter.com/5Xyo4OGNZn
तर दुसऱ्या एका युजर्सनं म्हटलं आहे की, इंशाल्लाह... मेडिकल सायन्सला विसरून जा, अल्लाहसुद्धा यांचा बचाव करू शकत नाही. अशाच प्रकारे ट्रोल करणारे अनेक ट्विट्स सोशल मीडियावर येत असून, ओवैसींना त्यात लक्ष्य केलं जात आहे.Asaduddin Owaisi claims he donated 15 bottles of blood in a single day, which is approximately 90% of blood in human body
— Le desi mojito 😍 (@desimojito) October 18, 2019
Because Muslims don’t lie !!! https://t.co/BQVGhYWj7o