मुंबईः एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत. ओवैसी यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक विधान केलं होतं, त्यानंतर सोशल मीडियातून ओवैसींची खिल्ली उडवण्यात आली आहे. एका प्रचारसभेत ओवैसी म्हणाले होते की, मी एका दिवसात 15 बॉटल रक्तदान केलं, त्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका केली जात आहे.
ओवैसींच्या एका दिवसात 15 बॉटल रक्तदान केल्याच्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. त्यानंतर सोशल मीडियावरून त्यांचा नेटकऱ्यांनी खरपूस समाचार घेतला. या व्हिडीओत ते म्हणतात, मी फक्त रक्तदानच केलं नाही, तर रक्त देण्यासाठी हैदराबादेतल्या उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये पीडित रुग्णाच्या बिछान्यापर्यंत पळत गेलो होतो.