Join us  

शेतकऱ्यांना मुद्दा, अनिल पाटील उत्तर देऊ लागले, मदतीला धनंजय मुंडे आले; जयंत पाटलांनी डिवचलं; सभागृहात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 1:50 PM

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आमदार जयंत पाटील आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली.

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन काल २७ जूनपासून सुरू झाले आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. काही महिन्यातच राज्यात विधासभेच्या निवडणुका होणार आहेत, यामुळे या अधिवेशानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.आज अधिवेशनाचा दुसरा दिवस  असून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार'पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil) आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात जुगबंदी पाहायला मिळाली. 

Maharashtra Interim Budget 2024 Live: थोड्याच वेळात अर्थमंत्री अजित पवार सादर करणार अर्थसंकल्प

विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस सुरू आहे. आज काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन प्रश्न उपस्थित केला. आमदार थोरात म्हणाले, मागील वर्ष हे टंचाईचे होते, या परिस्थीतही शेतकऱ्यांनी पीक आणली. बारमाही पीक होती त्याच जानेवारी महिन्यात नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे मोठे नुकसान झाले, आता जुलै महिना जवळ आला आहे. सहा महिने होऊनही शेतकऱ्यांसाठी काहीही निर्णय घेतलेला नाही. फक्त कागद फिरत आहेत, याचा अर्थ शेतकऱ्यांबाबत कोणताही ओलावा तुमच्यात नाही. आज नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे होते, पुन्हा खरिपासाठी त्या शेतकऱ्यांना काम करावं लागतं. आता अजुनही सर्व्हे येणार असल्याचं सांगत आहेत, अशी पद्धत कधीच नव्हती. यावर सहा महिने निर्णय नाही, या मुद्द्यावर आता तातडीने निर्णय घेणार का? हा माझा प्रश्न आहे, असा सवाल आमदार थोरात यांनी यावेळी केला. 

या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मंत्री अनिल पाटील देत होते. अनिल पाटील म्हणाले, आम्ही याबाबत १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी तारीख दिली आहे. यासाठी आमचं काम सुरू आहे. याच्यातून कोणताही शेतकरी वगळला जाऊ नये म्हणून केंद्र सरकारने २०१६ मध्ये एनडीव्हीआयचे निकष लागू केले आहेत. ते निकष लागू झाल्यानंतर आठ दिवसात ती मदत केली जाईल, असं उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी दिले. यावेळी सभागृहात 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी एनडीव्हीआय म्हणजे काय याची माहिती देण्याची मागणी केली. 

मंत्री धनंजय मुंडेंनी उत्तर दिले 

आमदार जयंत पाटील यांच्या प्रश्नानंतर मंत्री धनंजय मुंडे उत्तर देण्यासाठी उभे राहिले. यानंतर जयंत पाटील यांनी ज्यांना प्रश्न विचारला आहे त्या मंत्र्यांनीच उत्तर दिले पाहिजे असं सांगितलं. यानंतर धनंजय मुंडे बोलताना म्हणाले, एनडीव्हीआयचा अहवाल वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाला दिला आहे. २०१६ पासून एनडीव्हीआयच्या निकषावर शेतकऱ्यांना मदत दिली जाते. एनडीआयचे निकष म्हणजे झाडाचे हिरवेपणा आहे. 'एनडीव्हीआय'चा फुलफॉर्म मराठी, कन्नड, हिंदी कोणत्या भाषेत सांगू का? असाल सवालही मुंडे यांनी केला. यावेळी सभागृहात विरोधकांकडून एनडीव्हीआय'च्या फुलफॉर्म काय अशी मागणी झाली.  यावेळी मुंडे यांनी इंग्रजीमध्ये फुलफॉर्म सांगितला. तसेच मुंडे म्हणाले, थोरात यांनी शेतकऱ्यांचा काढलेला मुद्दा महत्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या मदतीचे विरोधकांना काहीही पडलेलं नाही, विरोधकांना एनडीआयच्या फुलफॉर्मचे पडले आहे, असा आरोपही मंत्री धनंजय मुंडे यांनी केला. 

टॅग्स :विधानसभाजयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसधनंजय मुंडेअजित पवार