Maharashtra Politics : लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये काय बोलणं झालं? प्रवीण दरेकरांनी सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 01:57 PM2024-06-27T13:57:16+5:302024-06-27T14:00:35+5:30

Maharashtra Politics : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केल्याचे व्हिडीओ, आणि फोटो व्हायरल झाले आहेत.

maharashtra assembly monsoon session 2024 What happened between Uddhav Thackeray and Devendra Fadnavis in lift Praveen Darekar told | Maharashtra Politics : लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये काय बोलणं झालं? प्रवीण दरेकरांनी सगळंच सांगितलं

Maharashtra Politics : लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये काय बोलणं झालं? प्रवीण दरेकरांनी सगळंच सांगितलं

Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याआधी आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. याबाबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहे. एकमेकांचा टोकाचा विरोध करणाऱ्या दोन नेत्यांचा एकत्रित व्हिडीओ समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. 

शेतकरी कर्जमुक्त करा, 'लाडकी बहीण'सोबत 'लाडका भाऊ' योजना आणा; उद्धव ठाकरेंची मागणी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाचवेळी विधान भवनात आले. यावेळी त्यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली. यावेळी भाजपा नेते प्रवीण दरेकरही सोबत होते. फडणवीस आणि ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली याची माहिती प्रवणी दरेकर यांनी दिली. 

'ठाकरेंची मानसिकता विरोधी पक्षातचं राहायची'

"राजकारणात आपण राजकीय शत्रू असतो, कायमस्वरुपी शत्रू नसतो. लिफ्टमध्ये मी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसही सोबत आले. त्यावेळी कुणीतरी म्हणालं की तुम्ही दोघ एकत्रित आहात बरं वाटतं, त्यावेळी उद्धवजी मला म्हणाले की, याला पहिलं बाहेर काढा. त्यावेळी मी म्हणालो की, तुमचं अजून समाधान झालं नाही का? माझी बाहेर जायची तयारी आहे. होताय का एकत्र. मी म्हणालो, बोलता तसं करा. त्यानंतर आमच्यात थोडासा हास्यविनोद झाला. आम्ही लिफ्टमधून बाहेर आलो. पण, उद्धवजी विरोधी दिशेला गेले. आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. म्हणजे त्यांची मानसिकता विरोधी बसायची आहे, सत्तेच्या दिशेला ते आले नाहीत, असंही प्रवीण दरेकर म्हणाले. 

 प्रवीण दरेकर म्हणाले, विरोधकांना आता जनता बाय, बाय करेल. त्यांना विजयाचा छोटा फुगा मिळाला आहे. तो पूर्ण फुटणार आहे आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन आम्ही जिंकू, असंही दरेकर म्हणाले. राजकारणात आम्ही कोणाची कायमचे शत्रू नसतो, भेटलो तर बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती असते. त्यामुळे कधी भेटलो तर याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. राजकारणात व्यक्तिगत वैमनस्य नसते. मी शिवसेनेत नाही याचं त्यांना दु:ख सलत असतं, असंही दरेकर म्हणाले. 

आम्हाला लिफ्टची गरज नाही

"आता आमच्या तिनही लिफ्ट एकत्र झाल्या आहेत. त्यामुळे आमच्याच भक्कम लिफ्ट आहेत. यामुळे आता आम्हाला आणखी लिफ्टची गरज नाही, असा टोलाही दरेकर यांनी लगावला. 

Web Title: maharashtra assembly monsoon session 2024 What happened between Uddhav Thackeray and Devendra Fadnavis in lift Praveen Darekar told

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.