Join us  

जयंत पाटील म्हणाले, आज काय वेगळा मूड दिसतो, अजितदादा म्हणाले, "जबाबदारी वाढल्यावर.." सभागृहात टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 2:15 PM

Ajit Pawar : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा नववा दिवस आहे.

Ajit Pawar : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा नववा दिवस आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. 'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरूनही जोरदार हल्लाबोल सुरू होते. दरम्यान, आज अजित पवार यांनी या आरोपांना सभागृहात प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी  रंगली. 

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्पावरील  विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर दिले. सभागृहात बोलताना अजित पवार म्हणाले, मी सगळ्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकणार नाही, फक्त महत्वाच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थस्थितीबाबत किंवा महसूल आणि तूट याबाबत प्रश्न काहींनी उपस्थिती केले. या सभागृहात मला सांगायचं आहे, जयंत पाटील यांनी सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम जयंत पाटील यांनी केला, असं पवार म्हणाले. यावेळी अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी रंगली. 

जागा ११, उमेदवार १२; अर्ज माघारीसाठी राहिले फक्त दोन तास; नार्वेकरांसाठी शिंदे की पवार गट रसद देणार?

यावेळी जयंत पाटील म्हणाले, माझा अर्थसंकल्प सलग होता. यावेळी अजित पवार म्हणाले, ते तर रेकॉर्ड आहेच. जसं वसंतराव नाईक यांचं सलग ११ वर्ष होतं, याबद्दल जयंतराव तुमचं अभिनंदन. यावेळी जयंत पाटील म्हणाले, आज काय वेगळाच मूड दिसतोय. यावेळी अजित पवार म्हणाले, मोठी जबाबदारी मिळाल्यावर मूड बदलावा लागतो. यावेळी सभागृहात हशा पिकला.

अजित पवारांच विरोधकांवर निशाणा

"कुणाच्या हाताखाली काम करत असताना त्यांनी केलं, मी कुठे काय केलं असं ढकलाव लागतं. मला सभागृहात दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली. आम्हाला काहीतरी अभुनभ आहे, इतरांच्या एवढा अनुभव नाही. मला महाविकास आघाडीत होतो तेव्हाही मला अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली होती. ज्यावेळी मी महाविकास आघाडीचा अर्थसंकल्प मांडला तेव्हा महायुतीने माझ्यावर टीका केली. आता महायुतीचा अर्थसंकल्प मांडला तेव्हा महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली. तो मनुष्य स्वभाव आहे. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, असंही अजित पवार म्हणाले. 

या अर्थसंकल्पात सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत काहींनी प्रश्न उपस्थित केले. जयंतरावांनी ९ वेळा अर्थसंकल्प मांडला. मी १० वेळा बजेट मांडलं. त्यामुळं थोडा बहुत अनुभव आहे. महाविकास आघाडी असो महायुती असो मी दोन्ही बाजूंनी मीच अर्थसंकल्प मांडला. पण इकडनं मांडला की तिकडचे टीका करतात, तिकडनं मांडला की इकडचे टीका करायचे, असा टोलाही अजित पवार यांनी विरोधकांना लगावला.

टॅग्स :विधानसभाअजित पवारजयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस