Join us

'अदानींची गाडी चालवणारा ड्राईव्हर तुमच्यासोबत'; नितेश राणेंचा गुजरात बसवरुन रोहित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 12:56 PM

Nitesh Rane : विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया पहिल्यांदाच भारतात आली. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात परेडचे आयोजन केले होते. यावेळी क्रिकेटपटूंसाठी वापरण्यात आलेली बस गुजरातची होती, यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

Nitesh Rane On Rohit Sharma : T20  विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया पहिल्यांदाच भारतात आली. काल टीम इंडियाचे दिल्लीत जोरदार स्वागत करण्यात आले, यानंतर मुंबईत मरीन ड्राईव्ह परिसरात परेडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टीम इंडियासाठी बीसीसीआयने दोन बस आणल्या होत्या, या बस गुजराती पासींगच्या होत्या. यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत, काल 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली. या टीकेला आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर देत पवार यांच्यावर निशाणा साधला. 

"सरकार शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी करतंय", लाडकी बहीण योजनेवरही विजय वडेट्टीवारांची टीका 

"देशात केंद्रात एक राहुल गांधी यांच्या नावाने बालबुद्धि आहेत, आणि आपल्याकडे भांडूपमध्ये एक आहेत. यांच्यात कोणाची बुद्धी लहान आहे यावरुन आता आपसातच स्पर्धा लागली आहे. काल झालेल्या परेडमध्ये बस वापरली ती बस गुजरातच्या नंबरप्लेटची होती, म्हणून लगेच गुजरातच्या नावाने  मिरच्या झोंबल्या. अन्यवेळी ढोकळे खायचे. यांच्या मालकाने अंबानींच्या लग्नात जायचं आणि सकाळी उठून यांचा कामगार गुजरातच्या नावाने खडे फोडणार, असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.  'यांना माहित नव्हतं, आपल्याकडे असणाऱ्या बीएसटीच्या बसेस खराब झाल्या होत्या. म्हणून मुंबई क्रिकेट असोएशियनने या बस आणण्याचा निर्णय घेतला, असंही आमदार नितेश राणे म्हणाले. 

रोहित पवारांना टोला

यावेळी आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. आमदार नितेश राणे म्हणाले, "विजय वडेट्टीवार यांनी अदानी यांच्यावर बोलण्याआधी अदानींचा एक खास ड्राईव्हर तुमच्या महाविकास आघाडीत तुमच्याबरोबर आहे. तो मुंबईत आल्यावर अदानींची गाडी चालवतो.त्याच ड्राईव्हरने काल त्या बसवर टीका केली होती आणि संध्याकाळी वानखेडेमध्ये फोटो काढण्यासाठी रोहित शर्माच्या मागे पळत होते, असा टोलाही नाव न घेतला आमदार नितेश राणे यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला.   

...म्हणून गुजरातच्या बस वापरल्या

आपल्या बीएसटीकडे असणाऱ्या दोन खराब अवस्थेत आहे, ते चालवण्याच्या स्थितीत नाहीत. काल वर्ल्डकपच्या जिंकल्यानंतर भारत देश जिंकला होता, यात काही गुजरात संघ जिंकला नव्हता. संपूर्ण देश जिंकला होता. यामुळे बेस्टच्या बस नव्हत्या म्हणून गुजरातवरुन बस मागवण्यात आल्या, असंही आमदार नितेश राणे म्हणाले. काही लोक सकाळी उठून गुजराती समाजावर टीका करतात आणि रात्री गुजराती लोकांच्या लग्नात जाऊन नाचतात, असा टोलाही राणे यांनी संजय राऊतांवर लगावला. 

टॅग्स :नीतेश राणे रोहित पवारराष्ट्रवादी काँग्रेसबीसीसीआय