Join us  

Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 7:35 PM

Maharashtra Assembly Session : राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून आता तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

Maharashtra Assembly Session ( Marathi News ) : लोकसभेच्या निवडणुका संपल्या, एनडीएने सरकार स्थापनही केले. दरम्यान, आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. याआधी विधिमंडळाचे पावसाठी अधिवेशन होणार आहे. पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली आहे. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या २७ जूनपासून सुरू होत असून ते १२ जुलैला संपणार आहेत. 

Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी याची अधिसूचनाही जारी केली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूनीवर विधिमंडळाचे हे पावसाळी अधिवेशन होत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडीने भरघोस यश मिळवल्याने आता हे अधिवेशन खास असणार आहे. तसेच राज्य सरकार २८ जून रोजी २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामुळे या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

आगामी काळात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, यामुळे या अधिवेशनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. राज्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या आहेत, तर महायुतीला अपेक्षीत जागांवर विजय मिळवता आलेला नाही. यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीनेही विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. 

अधिवेशन विविध मुद्द्यावर गाजणार

या अधिनेशनामध्ये राज्यातील दुष्काळ आणि अन्य विषयांवर चर्चा होणार असल्याची चर्चा आहे, तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा विधिमंडळात गाजणार असल्याची चर्चा आहे. 

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला बसलेला फटका आणि महाविकास आघाडीने मारलेली मुसंडी या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे. त्यामुळे मविआचे आमदार आक्रमक असतील. महायुतीतील कुरघोड्यांचे पडसादही उमटण्याची चिन्हे आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्र बजेट 2024राष्ट्रवादी काँग्रेसभाजपाशिवसेना