“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 05:55 PM2024-11-25T17:55:45+5:302024-11-25T17:57:01+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेता होणार का, याबाबत सूचक प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलाच धक्का बसला. अविश्वसनीय, अनाकलनीय आणि अस्वीकार्ह निकाल असल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांकडून देण्यात आली. महायुतीच्या त्सुनामीत महाविकास आघाडीचा मोठा धुव्वा उडाला. महाविकास आघाडीला आता विरोधी पक्षनेता बसवणेही शक्य होणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला २० जागांपर्यंत मजल मारता आली. यानंतर मातोश्रीवर महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत काय घडले, याची माहिती ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, या बैठकीत सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भास्कर जाधव गटनेते असणार आहेत. विशेष म्हणजे विधिमंडळातील दोन्ही सभागृहांचे संयुक्त नेते म्हणून आदित्य ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ गटाच्या नेत्यांची, आमदारांची बैठक झाली. या बैठकीला लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषदेतील सदस्य उपस्थित होते. आगामी काळात भले २० आमदार आले असतील, पण ताकदीने लढण्याचा निर्धार सर्वांनी बोलून दाखवला आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून चुकीचे दावे केले जात आहेत
शिवसेना शिंदे गटाकडून चुकीचे दावे केले जात आहेत. आमचे आमदार फुटणार नाही. खोट्या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार पसरवल्या जात आहेत. या बैठकीला सगळे उपस्थित होते, आमदार आमच्यासोबत होते, आहेत आणि पुढेही असतील. हा शुद्ध खोटेपणा आहे, असा पलटवार दानवे यांनी केला.
दरम्यान विधिमंडळाची ही नियमित प्रक्रिया आहे. ज्या पद्धतीने प्रक्रिया पार पाडावी लागते, त्याची तयारी पक्षाने केली आहे. नवीन काही पक्षाने केलेले नाही. सरकार अजून स्थापन झालेले नाही. अजून कोणी सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. त्यानंतर विरोधी पक्षनेता कोण होईल, यावर महाविकास आघाडीतील तीन पक्ष बसून निर्णय करतील,