Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 07:32 PM2024-11-23T19:32:44+5:302024-11-23T19:37:28+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: मनसेची खालावलेली कामगिरी, अमित ठाकरेंचा पराभव, महाविकास आघाडीला मिळालेला चेकमेट आणि महायुतीचा झालेला जायंट विजय, या सर्वांवर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 results chief raj thackeray reaction on big wins of mahayuti and defeat of maha vikas aghadi with mns | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. अवघ्या राज्याचे लक्ष काय निकाल लागणार याकडे लागले आहे. जवळपास सर्वच ठिकाणचे चित्र स्पष्ट झालेले आहे. अनेक ठिकाणी उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहेत. महायुतीचा दणदणीत विजय झाला असून, महाविकास आघाडी चांगलीच चितपट झाल्याचे पाहायला मिळत आहे. अद्यापही अनेक ठिकाणचे अंतिम निकाल येणे बाकी असले तरी राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याबाबत भाष्य केले आहे. 

या लोकसभा निवडणुकीत मनसे संपूर्ण ताकदीने उतरली होती. राज्यभरात अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले. राज ठाकरे यांनीही राज्यभरात प्रचारसभा घेतल्या होत्या. विशेष म्हणजे राजपुत्र अमित ठाकरे मनसेकडून उमेदवारी देण्यात आली होती. यासाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात आले. परंतु, त्यात यश आले नाही. यानंतर मतदान झाले आणि निवडणुकांचे कल हाती आल्यावर मनसेसह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला.

राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य

या निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेने मनसेला पूर्णपणे नाकारल्याचे पाहायला मिळत आहे. माहीम मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी बाजी मारली. तर या ठिकाणी उमेदवार असलेले अमित ठाकरे तिसऱ्या स्थानी राहिले. अमित ठाकरे यांना ३३ हजार ०६२ मते मिळाली. एवढेच नव्हे तर मनसेचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे एकमेव आमदार राजू पाटील यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, गजानन काळे, मयुरेश वांजळे यांच्यासह मनसेच्या सर्वच उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. यावर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले, ‘अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच...’

 दरम्यान, माहीममध्ये पराभव झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले की, गेली अनेक वर्षे या प्रभागातील अगदीच बेसिक गरजांसाठी लोकांचा संघर्ष बघितला. याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी, प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एक नवा अध्याय लिहावा, केवळ या हेतूने मी या निवडणुकीत उतरलो होतो. मात्र, कदाचित येथील जनतेच्या मनात काही वेगळे असावे. हा कौल मला हेच शिकवतोय की, अजून खूप काम करायचं आहे. अजून मेहनत घ्यायची आहे. अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आपला विश्वास मिळवण्यासाठी अजून झटायचं आहे. माझी ही लढाई कधीच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नव्हती. कारण ही लढाई कोणा राजपुत्राची नसून, ती होती एका सामान्य कार्यकर्त्याची - जो सर्वांसाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतो. मला फक्त आपल्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणायचं होतं. तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी, माहीम, दादर, प्रभादेवी आणि सबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी, मी २४ तास झटत राहीन, हा माझा शब्द आहे. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मतदान केलं, त्यांचे मनापासून आभार. तुमचा विश्वास वाया जाणार नाही. तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन… कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू असं मी वचन देतो.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 results chief raj thackeray reaction on big wins of mahayuti and defeat of maha vikas aghadi with mns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.