“राज्यात गुंडशाही, फडणवीस प्रचारात फिरतायत; रश्मी शुक्लांची तातडीने बदली करा”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 11:28 AM2024-10-29T11:28:50+5:302024-10-29T11:29:35+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रामध्ये निवडणुका त्यांना शांततेत करायच्या नाहीत, अशी टीक संजय राऊतांनी केली.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 thackeray group mp sanjay raut criticized mahayuti govt over security issue in state | “राज्यात गुंडशाही, फडणवीस प्रचारात फिरतायत; रश्मी शुक्लांची तातडीने बदली करा”: संजय राऊत

“राज्यात गुंडशाही, फडणवीस प्रचारात फिरतायत; रश्मी शुक्लांची तातडीने बदली करा”: संजय राऊत

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: शिवसेना शिंदे गटाचे लोक पराभवाच्या भीतीने आमच्या लोकांना धमक्या देत आहेत. आमच्या लोकांवर दबाव आणत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार सुरु आहेत. मालेगाव बाह्यचे आमचे उमेदवार अद्वय हिरे यांच्यावर दादा भुसे यांच्या गुंडांनी हल्ला केला. अद्वय हिरे हे प्रचाराच्या फेरीत असताना दादा भुसेंच्या लोकांनी अद्वय हिरेंच्या वाहनांवर हल्ला केला. हल्लोखोरांकडे लोखंडी गच, तलवारी, गावठी पिस्तुले होती. अद्वय हिरेंना ठार मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाला, असा मोठा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधाल. पोलिसांनी यासंदर्भात अद्यापही ठोस कारवाई केली नाही. हे प्रकरण फक्त मालेगावबाबत मर्यादित नाही. या महाराष्ट्रामध्ये निवडणुका त्यांना शांततेत करायच्या नाहीत, असा याचा अर्थ होतो. पोलीस यंत्रणा राजकीय कामाला जुंपलेली आहे. अद्वय हिरे हे सुदैवाने बचावले, असे संजय राऊत म्हणाले.

रश्मी शुक्लांची तातडीने बदली करा

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठल्यातरी जीपवर बसून कुठे ना कुठे फिरताना दिसत असतात. केंद्रीय गृहमंत्री राज्यांमध्ये फिरून आपण कसे जिंकणार, याची तयारी करत आहेत. देशाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना आमचे आवाहन आहे की, राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करावी. राज्यात ज्या पद्धतीने गुंडशाही सुरू आहे त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

दरम्यान, सध्या घडीला पोलीस यंत्रणा राजकीय कामाला झोपली आहे एका पक्षाच्या कामाला जंपली आहे. त्यामुळे निवडणुका स्वच्छ वातावरणात होणार नाही. हा आमचा अंदाज होता तो आता खरा होताना दिसत आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 thackeray group mp sanjay raut criticized mahayuti govt over security issue in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.