“सांगली पॅटर्न लोकप्रिय नाही, मित्र पक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही अन्यथा...”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 11:49 AM2024-10-30T11:49:52+5:302024-10-30T11:51:57+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: २८८ जागा आघाडीत कोणालाच लढता येत नाही. आम्हाला या राज्यात बदल घडवायचा आहे आणि बदल घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहणे गरजेच आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 thackeray group sanjay raut claims that maha vikas aghadi party not follow aghadi dharma | “सांगली पॅटर्न लोकप्रिय नाही, मित्र पक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही अन्यथा...”: संजय राऊत

“सांगली पॅटर्न लोकप्रिय नाही, मित्र पक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही अन्यथा...”: संजय राऊत

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोऱ्या झाल्या आहेत. प्रत्यक्ष सांगलीत पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील एकमेकाच्या विरुद्ध उभे आहेत. मग सांगली पॅटर्न कोणाचा? पृथ्वीराज पाटील अधिकृत उमेदवार आहेत. विशाल पाटील यांच्या वहिनी जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली. मिरजेची जागा शिवसेनेला सुटली. तानाजी सातपुते यांनी अर्ज भरला आहे. भाजपातून आलेल्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली, मग कसला सांगली पॅटर्न? हे समजून घेतलं पाहिजे. ज्या रोहित पाटील यांनी लोकासभेत विशाल पाटील यांचे काम केले. त्यांना अशाच सांगली पॅटर्नचा सामना करावा लागत आहे, असे सांगत संजय राऊत यांनी सांगली पॅटर्नबाबत होणाऱ्या चर्चांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सांगली पॅटर्न हा महाराष्ट्राचा लोकप्रिय पॅटर्न नाही. एका विशिष्ट व्यवस्थेत निर्माण झालेला तो पॅटर्न आहे. मविआचा काम सर्वांनी एकत्र केले असते, तर शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील नक्कीच विजयी झाले असते. पण मित्र पक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही, त्यामागे काही विशिष्ट कारण असतील. त्यामुळे अपक्ष निवडून आले. मविआला निवडणूका जिंकायच्या आहेत. त्यामुळे दोन-चार जागा मित्र पक्षाने जास्त लढल्या आणि जिंकल्या, तर इतर घटक पक्षांना वाईट वाटण्याचे कारण नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

सांगलीचा दाखला लोकांनी विसरायला पाहिजे

विदर्भात काँग्रेस पक्ष सर्वांत जास्त जागा लढतोय विदर्भात ६४ जागा आहेत. विदर्भात काँग्रेस विषयी एक वेगळी भावना आहे. त्याच्यामुळे काँग्रेसच्या जागा जास्त दिसतात. ज्या भागात जो पक्ष जिंकू शकेल, त्याने तिथे लढायचे असे आम्ही ठरवले. निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्याआधी एकत्र बसू आणि आमच्या प्रत्येक घटक पक्षाच्या उमेदवाराने अर्ज भरलाय त्याची समजूत काढू. ९० टक्के जागांवर तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढलेली आहे. उर्वरित जागांवर तिन्ही पक्ष एकत्र बसून, लोकांची नाराची दूर करण्याच प्रयत्न करु. सांगलीचा दाखला लोकांनी विसरायला पाहिजे. तेव्हा एक घटना घडली. त्याची कारण वेगळी होती, असे संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, आम्हाला या राज्यात बदल घडवायचा आहे आणि बदल घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहणे गरजेच आहे. प्रत्येकाला उमेदवारीची इच्छा असते. २८८ जागा आघाडीत कोणालाच लढता येत नाही. विशेष तीन पक्ष एकत्र असतान कार्यकर्त्यांची कुंचबणा होता असते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 thackeray group sanjay raut claims that maha vikas aghadi party not follow aghadi dharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.