Join us

वंचित आघाडीचे आज महाराष्ट्र बंदचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 6:54 AM

केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारित कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी, महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.

मुंबई : केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारित कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी, महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. बंदला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचा दावा आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यात एकूण ३५ संघटना सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या नागरिकत्व कायद्याला विरोध करीत आंबेडकर यांनी ढासळत्या अर्थव्यवस्थेला मोदी सरकार जबाबदार असल्याची टीका केली. ालोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत आहे. नागरिकत्व कायद्याला विरोध होत असताना, हा कायदा लागू करणारच, अशी भूमिका शहा मांडत आहेत, हे दुर्दैव आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :प्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडीनागरिकत्व सुधारणा विधेयक