Maharashtra Bandh: कळंबोलीजवळची वाहतूक पुन्हा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 07:16 AM2018-07-25T07:16:14+5:302018-07-25T17:38:53+5:30

Maharashtra Bandh - मुंबईतील सकल मराठा समाजाने मुंबईसह, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुकारलेला बंद स्थगित केला आहे. या बंदमुळे मुंबईतील रस्ते आणि लोकल वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी बंदला हिंसक वळणही लागले.

Maharashtra Bandh Live - The issue of Maratha reservation today resumed in Kalamboli Navi Mumbai | Maharashtra Bandh: कळंबोलीजवळची वाहतूक पुन्हा सुरू

Maharashtra Bandh: कळंबोलीजवळची वाहतूक पुन्हा सुरू

googlenewsNext

Maharashtra Bandh Live - मुंबईतील सकल मराठा समाजाने मुंबईसह, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुकारलेला बंद स्थगित केला आहे. मुंबईतील सकल मराठा समाजाने दुपारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. मुंबईतील बंदचे पडसाद राज्यभर उमटल्याचे दिसून आले. या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले, तर अनेक ठिकाणी दगडफेकही करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून आज मुंबई, ठाणे, कल्याणसह अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. मात्र, दुपारी हा बंद स्थगित केल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

मुंबईतील बंदचे पडसाद राज्यभर उमटाताना दिसत आहेत. साताऱ्यात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तर नवी मुंबईतील कळंबोली येथे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला.

मुंबईत कडेकोट बंदोबस्त

मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने मुंबईत पार पडणाऱ्या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांच्या विशेष शाखेचा या आंदोलनावर वॉच असणार आहे. सोशल मीडियावरील प्रत्येक हालचाली सायबर सेलच्या रडारवर आहेत. तर सर्व पोलीस ठाण्यांतील पोलिसांकडून विभागातील बारीक हालचालींवरही लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच काही पोलीस साध्या वेशात या आंदोलनात सहभागी होत सर्व हालचालींवर लक्ष ठेवून असणार आहेत. शहरातील सीसीटीव्हींच्या माध्यमातून नियंत्रण कक्षही अलर्टवर आहे. सोशल मीडियाच्या हालचालींवर सायबर सेलच्या अधिकाऱ्यांचे लक्ष आहे. 

Live Update - 

कळंबोलीजवळची वाहतूक पुन्हा सुरू 

कळंबोली येथे आंदोलक पुन्हा रस्त्यावर, मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक पुन्हा रोखली

कोपरखैरणे मध्ये पोलीस चौकीजवळ दोन मोटारसायकल एक कार जाळली

कोपरखैरणे डी मार्टजवळ पोलीस चौकी जाळली

नवी मुंबई- कोपरखैरणे डी मार्ट चौकात आंदोलकांची दगडफेक, पोलिसांनी लाठीचार्जसह हवेत गोळीबार केला

कळंबोलीतील रास्ता रोको सहा तासांनंतर मागे, मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक सुरू 

घणसोली स्थानकाजवळचा रेल रोको थांबवला, ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतून तीन तासांनंतर सुरू 

मराठा आरक्षणावरील चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलवा - अशोक चव्हाण 

'मुंबई बंद' स्थगित, सकल मराठा समाजाची घोषणा

मुंबईतील मराठा आंदोलनाचा वाहतुकीवर परिणाम, ठाणे-वाशी, ठाणे-नेरुळ मार्गावरील लोकलसेवा बंद 

नवी मुंबई आणि कळंबोलीत पोलिसांचा आँदोलकांवर लाठीचार्ज तर जमाव पांगवण्यासाठी हवेत गोळीबार

चेंबूर नाका, चेंबूर स्टेशन आणि आसपासच्या परिसरात दुकानं बंद.

सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक व्यवस्थित सुरू , फ्री वे वर सुद्धा वाहतूक व्यवस्थित सुरू, दुकानदारांनी दुकानं मात्र ठेवली बंद
नवी मुंबई सायन पनवेल महामार्ग वाशी गाव रास्ता रोको

दादरमध्ये शिवसेना भवनकडे येणारा रस्ता मराठा आंदोलकांनी रोखला

नवी मुंबई - घणसोली रेल्वेस्थानकात रेलरोको

ठाणे लोकल रेल्वे स्थानकावरही आंदोलकांकडून रेलरोको करण्याचा प्रयत्न

भायखळा पूर्वेकडील घोडपदेव परिसरात कडकडीत बंद.

मराठा आंदोलकांच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणा, जोगेश्वरीजवळ आंदोलकांकडून लोकल रोखण्याचा प्रयत्न.

घणसोली नवी मुंबई येथे पहाटे दोन बेस्ट बसवर (workman bus) दगडफेक झाल्यामुळे ऐरोली ते वाशीपर्यंत बेस्टची बससेवा बंद आहे.
मुलुंडकडून वाशीच्या दिशेने जाणारी बस सेवा ऐरोली पर्यंत चालविण्यात येत आहे.

मुंबईत रिक्षा, टॅक्सी, लोकल, मेट्रो वाहतूक सुरुळीत सुरू.

मुंबई बंदला शिवसेनेचा पाठिंबा, पण बंदमध्ये सहभाग नाही.

मुंबईत नागरिकांना त्रास न होऊ देण्याचं शिवसेनेकडून आवाहन
आजचा बंद शांतता मार्गाने पार पाडण्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून आवाहन.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात टीएमटी बसची तोडफोड, तीनहात नाक्यावर आंदोलकांची घोषणाबाजी.

पनवेलमध्ये बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद


 



 

व्हिडिओ - 

ठाणे लोकल रोखण्याचा प्रयत्न

रेलरोको

नवी मुंबई सायन पनवेल महामार्ग वाशी गाव रास्ता रोको

आंदोलनात कडक पोलीस बंदोबस्त

Web Title: Maharashtra Bandh Live - The issue of Maratha reservation today resumed in Kalamboli Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.