Join us

Maharashtra Bandh: मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका, झेपत नसेल तर सत्ता सोडा! - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 1:50 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. आधीचं असो किंवा आत्ताचं, या दोन्ही सरकारांना फक्त मतं हवी आहेत.

मुंबई -  मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने लोकांच्या भावनांशी खेळत न बसता तत्परतेनं भूमिका घ्यावी आणि ते जर झेपत नसेल तर पायउतार व्हावं, असं रोखठोक मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलं आहे. सकल मराठा समाजाने मंगळवारी पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला आणि कालच्या 'मुंबई बंद'ला हिंसक वळण लागलं होतं. औरंगाबाद येथे जलसमाधी आंदोलनात काकासाहेब शिंदे या तरुण आंदोलकाचा मृत्यू झाल्यानं मराठा आंदोलन चिघळलं आणि आता त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसताहेत. रास्ता रोको, दगडफेक, जाळपोळ, तोडफोडीचं लोण राज्यभरात पसरतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागलीय. 

(Mumbai Bandh: 'मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाची बदनामी आणि फसवणुकीचा प्रयत्न' )

या पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. आधीचं असो किंवा आत्ताचं, या दोन्ही सरकारांना फक्त मतं हवी आहेत. पण या मतांसाठी मराठा समाजाच्या भावनेशी खेळणं अत्यंत वाईट आहे. मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेता येत नसेल, तर सत्ता सोडावी, अशी चपराकही त्यांनी लगावली आहे.

टॅग्स :मराठा क्रांती मोर्चाराज ठाकरेमहाराष्ट्र बंद