Maharashtra Bandh : आज वसुली चालू आहे की बंद?, अमृता फडणवीसांचा खोचक टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 03:49 PM2021-10-11T15:49:19+5:302021-10-11T15:51:16+5:30

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence) इथं काही दिवसांपूर्वी एका वेगवान कारने शेतकऱ्यांना चिरडण्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात पसरले.

Maharashtra Bandh: Is recovery on or off today ?, Amrita Fadnavis's scathing remark | Maharashtra Bandh : आज वसुली चालू आहे की बंद?, अमृता फडणवीसांचा खोचक टोमणा

Maharashtra Bandh : आज वसुली चालू आहे की बंद?, अमृता फडणवीसांचा खोचक टोमणा

Next
ठळक मुद्देअमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलाच टोला लगावलाय. अमृता यांनी ट्विट करुन एक प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तरही देण्याचं त्यांनी सूचवलं आहे.

मुंबई - उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील घटनेच्या विरोधात महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या बंदला भाजपने विरोध केला आहे. लखीमपूर घटनेला जालियनवाला बाग म्हणताना मावळमध्ये गोळीबार झाला तेव्हा जालियनवाला बाग आठवले नाही का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. तर, महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदवरुन अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलाच टोला लगावलाय. अमृता यांनी ट्विट करुन एक प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तरही देण्याचं त्यांनी सूचवलं आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence) इथं काही दिवसांपूर्वी एका वेगवान कारने शेतकऱ्यांना चिरडण्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात पसरले. विरोधकांनी या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. इतकचं नव्हे तर ही वेगवान कार भाजपाच्या केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र चालवत असल्याचं आरोप झाला. युपीतील या घटनेविरुद्ध राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बंद पुकारला आहे. महाविकास आघाडीच्या या बंदला भाजपाने विरोध केला आहे. आता, अमृता फडणवीस यांनी बंदवरुन थेट निशाणा साधला. 

आज वसुली चालू आहे की बंद, कोणी मला अपटेड देईल का.. असे म्हणत अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. दरम्यान, 100 कोटींच्या वसुली प्रकरणाशी या बंदला जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.  

न्यायालयाने सुमोटो दाखल करुन घ्यावी

कुणीतरी गाडीखाली चिरडले म्हणून इतरांना चिरडण्याचा अधिकार कुणाला मिळालेला नाही. ते जेवढे निंदनीय असेल तर त्याला समोर ठेवून असे काम होईल तर ते देखील तेवढेच निंदनीय आहे, अशी टीका करत अशा प्रकारचा बंद कसा काय पुकारला जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे बंद केले जाऊ नयेत, असे म्हटले आहे. उच्च न्यायालयाला आवाहन करेन की, याबाबत सुओ मोटो दाखल करून घ्यावी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते. 

म्हणून बंद, अत्यावश्यक सेवा सुरू

लखीमपूर खेरीतील घटनेत ४ शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेचा निषेधार्थ महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंद(Maharashtra Bandh) हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना(Shivsena), काँग्रेस(Congress), राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) राज्यभरात हा बंद पुकारला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांना शांततेत बंद करावा असं आवाहन करण्यात आले आहेत. महाराष्ट्र बंदमध्ये हॉस्पिटल, रुग्णवाहिका, आरोग्य सुविधेशी निगडीत कार्यालयं आणि त्यांची वाहतूक, सरकारी कार्यालये, स्वच्छता यंत्रणांना बंदमधून वगळण्यात आलं आहे. सर्व दुकाने, व्यापार, कारखाने, खासगी कार्यालये, हॉटेल्स, ऑटो-टॅक्सी सेवा आदी बंद करण्याचा इशारा आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा बंदमध्ये सहभागी नसणार आहे. 

Web Title: Maharashtra Bandh: Is recovery on or off today ?, Amrita Fadnavis's scathing remark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.